जामखेड न्युज——
विजय जाधव यांनी दिलेल्या गटशिक्षणधिकारी यांच्या विरोधातील तक्रारीला सर्व शिक्षक संघटनांचा विरोध.
पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सर्व शिक्षक संघटनांचे निवेदन
जिल्हा परिषद मोहा शाळेतील शिक्षक विजय
जाधव यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे गटशिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे यांनी त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्याचा राग मनात धरुन वैयक्तिक द्वेषापोटी तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीचा आम्ही सर्व शिक्षक संघटना निषेध करत असून गटशिक्षणधिकारी धनवे यांच्या पाठीशी खंबिरपणे आहोत असे निवेदन सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने पालकमंत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
जामखेड-दिनांक 24/04/2024 रोजी जामखेड येथील शिक्षक विजय सुभाष जाधव याने गटशिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे पंचायत समिति जामखेड यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांना खोटी व दिशाभुल करणारी लेखी तक्रार अर्ज देऊन विविध वर्तमानपत्रात बातम्या देऊन शिक्षण विभागाची बदनामी केली. त्यांनी केलेल्या तक्रारी खोट्या आहेत. आम्ही सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी सहमत नाहीत व या प्रकाराचा तीव्र निषेध करतो. असे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की श्री बाळासाहेब धनवे गटशिक्षणधिकारी म्हणून जामखेड तालुक्यात हजर होऊन एक वर्ष झाले आहे. त्यांच्या कार्यकाळात तालुक्यात शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झालेली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जामखेड तालुक्याचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला आहे. त्याचबरोबर नवोदय स्पर्धा प्रवेश परीक्षात तालुक्यातील 9 जनांची निवड झालेली आहे. व NMS मध्ये 7 मुले उत्तीर्ण होऊन 5 जणाला शिष्यवृत्ति मिळाली आहे.
गटशिक्षणधिकारी धनवे यांनी शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी,2005 जूनी पेंशन प्रस्ताव, मेडिकल बिले, रजेचा पगार, सेवा पुस्तके अद्यावतीकरण इत्यादि प्रश्न प्राधान्याने सोडवले आहेत.श्री जाधव यांनी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक संघटना पदाधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या संदर्भत खोट्या तक्रारी केल्या आहेत.
गटशिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे यांनी किंवा त्यांचे कर्मचारी किंवा त्यांचे शिक्षक यांचे मार्फत तालुक्यातील कोणत्याही शिक्षक किंवा शिक्षिकेला पैशाची मागणी केलेली नाही. तसेच whats app ग्रुपवर मेसेज टाकन्याबाबत किंवा पोस्ट लाइक करणेबाबत सांगितलेले नाही. कोणत्याही महिला शिक्षिकेला त्रास दिलेला नाही. जाधव हे निनावी खोट्या सहीचे पत्र देऊन गटशिक्षणधिकारी धनवे व शिक्षकांना त्रास देत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व संघटना एकत्र येऊन जाधव यांनी केलेले आरोप हे बिनबूडाचे आहेत आणि सर्व शिक्षक संघटना या गटशिक्षणधिकारी धनवे यांच्या पाठीशी ठामपणे आहेत.असे लेखी दिलेल्या या निवेदनातून सांगितले आहे.
या निवेदनावर शिक्षक बँकेचे संचालक संतोषकुमार राऊत, शिक्षक मा. व्हा. चेअरमन नारायण राऊत, विश्वस्त मुकुंदराज सातपुते, शिक्षक नेते किसन वराट, जिल्हा कार्यध्यक्ष एकनाथ चव्हान, जूनी पेंशन संघटनेचे नेते केशवराज कोल्हे, शिक्षक नेते नारायण लहाने,शिक्षक नेते संतोष डमाळे, अनिलजी अष्टेकर, शिक्षक संघ तालुकाध्यक्ष नाना मोरे(संभाजी थोरात गट), महिला आघाडी च्या नेत्या कामिनीताई राजगुरु मॅडम व निशाताई कदम,जूनी पेंशन तालुकाध्यक्ष अविनाश नवसरे,शिक्षक नेते नवनाथ बहीर शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष(शिवाजी पाटील गट),समता परिषदचे विनोद सोनवणे, ऐकय मंडळ नेते संभाजी तुपेरे, वसंतराव नाईक संघटनेचे किशोर राठोड, विकास बगाड़े, रामेश्वर ढवळे,प्रदीप कांबळे, शिवाजी हजारे,संतोष हापटे, हनुमंत निम्बालकर,मल्हारी पारखे, काकासाहेब कुमटकर, रजनीकांत साखरे, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, राम निकम,सुरेश मोहिते, विक्रम बड़े, नवनाथ बड़े, राजेंद्र त्रिबके आदि. च्या स्वाक्षऱ्या आहेत.