जामखेड न्युज——
साकत घाटात सोलर पँनलचा कंटेनर पलटी, चालक जखमी
मुंबई वरून अहमदपूर येथे सोलर पँनल घेऊन चाललेला सोळा टायरचा कंटेनर घाटात वळण वसले नाही यामुळे पलटी झाला आहे गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे तर चालक जखमी झाला आहे. साकत घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. अरूंद घाट, मोठे चढ यामुळे साकत घाटात नेहमीच अपघात होत आहेत. घाटाचे चढ कमी करून घाट रूंद करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
मुंबई वरून अहमदपूर येथे सोलर पँनल घेऊन चाललेला सोळा टायरचा कंटेनर एम एच ४६ बी बी ८४९० घाटात वळण बसले नाही यामुळे पलटी झाला यात गाडीचे काही नुकसान झाले आहे. चालक दुर्गेश यादव यास कँबिन फोडून बाहेर काढले चालकाच्या पोटात मार लागला आहे. गाडीत वीट टन वजनाचे सोलर पँनल आहेत.
सध्या जामखेड पंचदेवालय ते सौताडा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता खोदलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक साकत मार्गे सुरू आहे. पण अरुंद घाटामुळे अवजड वाहनांना मोठी अडचण निर्माण होते. घाटात वळण लहान असल्याने गाड्यांना वळण बसत नाही.
जागतिक बँकेकडून करमाळा ते पाटोदा साकत मार्गे रस्ता सर्व्हे झाला आहे. लवकरात लवकर हा रस्ता सुरू व्हावा म्हणजे रूंद रस्ता व घाटाचे वळणे कमी करून चढ उतार कमी होतील. त्यामुळे लवकर रस्ता सुरू व्हावा अशी मागणी होत आहे.
साकत घाटात नेहमीच लहान मोठे अपघात होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर घाटाचे वळणे कमी करून रस्ता रूंद करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. म्हणजे अपघात कमी होतील. अशी मागणी होत आहे.