आण्णा सावंतवर दोन दिवसात दोन गुन्हे दाखल

0
1205

जामखेड न्युज——

आण्णा सावंतवर दोन दिवसात दोन गुन्हे दाखल

विशिष्ट विचारधारा घेऊन सोशल मीडियावर पत्रकार तसेच विविध राजकीय पक्षाविषयी अश्लिल भाषेत वक्तव्य करणाऱ्या आण्णा सावंतवर दोन दिवसात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. काल पत्रकारांनी जामखेड पोलीस स्टेशनला व भाजपा कार्यकर्ते यांनी खर्डा पोलीस स्टेशनला आण्णा सावंतवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्य व अपशब्द वापरणाऱ्या आण्णा सावंत यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 अन्वये भादवी कलम 500, 504 प्रमाणे खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील पत्रकारांविषयी अश्लील भाषा वापरल्यामुळे जामखेड पोलीस स्टेशनला आण्णा सावंत वर दिनांक 12 एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर अजून अनेक कारणामे केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी नागरिक धाडसाने पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

भाजपाचा वरिष्ठ नेत्यांच्या विषयी बदनामी केल्याप्रकरणी खर्डा भाजपा शहर अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य महेश सुरेश दिंडोरे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता माझे मोबाईल फेसबुक अकाउंट वरून श्रीकृष्ण उर्फ अण्णा आजिनाथ सावंत राहणार जामखेड यांनी त्याच्या मोबाईल मधील फेसबुक अकाउंट वरून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांविषयी डुकरे,कुत्रे व बाजार कुत्रे असे शब्द अपशब्द वापरून समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे त्यानुसार खर्डा पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता 1860 अन्वये भादवी कलम 500 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय आला आहे. अशाप्रकारे एकाच दिवसात दोन गुन्हे आण्णा सावंत वर दाखल झाल्याने जामखेड तालुक्यात पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात व कशी कारवाई याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भाजपा नेत्यांच्या बदनामी प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांना निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे,माजी सरपंच संजय गोपाळघरे, मार्केट कमिटीचे संचालक वैजिनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजू मोरे, बबलू सुरवसे, सागर सोनवणे, सोनाजी सुरवसे,आकाश खेडकर, अण्णा खाडे, दादा चौधार, फिरोज पंजाबी, सोनू इटकर, हरिदास जायभाय इत्यादी सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here