जामखेड न्युज———
रत्नदीप फार्मसीच्या विद्यार्थांची परीक्षा होणार स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकतमध्ये
रत्नदीप मेडिकल कॉलेज मधून होणारी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट तसेच मानसिक त्रास याविषयी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. याची दखल राज्य सरकार, विद्यापीठ यांनी घेतली होती तेव्हा या काॅलेजची मान्यता रद्द करावी व परीक्षा दुसऱ्या काॅलेजमध्ये घ्यावी अशी मागणी केली होती यानुसार रत्नदीप फार्मसीच्या विद्यार्थांची परीक्षा साकत येथील स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसीमध्ये होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
रत्नदीप फार्मसीच्या विद्यार्थांची उन्हाळी परीक्षा २०२४ च्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकतमध्ये घेण्यात यावी असे पत्र अक्षय जोशी उपसचिव महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ प्रा. का. छत्रपती संभाजीनगर यांनी दिले आहे.
स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकत ता. जामखेड जि.अ.नगर प्राचार्य यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, संस्था क्र. ६२३८१ यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, खालील दर्शविलेल्या विवरणपत्रातील संस्थेतील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा २०२४ च्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा आपल्या संस्थेत घेण्यात येणार आहेत.
१८८५ रत्नदीप फार्मसी काॅलेज जामखेड जि. अहमदनगर
२०४२- रत्नदीप काॅलेज आँफ फार्मसी रत्नापूर जि. अहमदनगर
२०५२- रत्नदीप टेक्निकल काॅलेज रत्नापूर अहमदनगर
तरी उपरोक्त संस्थेतील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा २०२४ च्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने नियोजन करुन वेळापत्रक तयार करुन पारदर्शक पणे नियोजनबद्ध परीक्षा घेण्यात येईल असे प्राचार्य गोरक्ष बारगजे यांनी सांगितले.
त्यांच्या मार्गदर्शनानुसार सदरील परीक्षा दि. १०-०४-२०२४ ते १९-०४-२०२४ या कालावधीत
पाडण्यात याव्यात. सदरील संस्थेतील विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे सर्व रेकॉर्ड आपल्याकडे अभिलेख म्हणून जतन करण्यात यावेत. तसेच सदर विद्यार्थ्यांच्या Internal Marks च्या संपूर्ण Marksheets आपल्या संस्थेच्या लॉगीन मधून भरण्यात याव्यात.
अक्षय घ. जोशी उपसचिव, म.रा. तंत्रशिक्षण मंडळ, प्रा.का. छत्रपती संभाजीनगर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.