Friday, February 13, 2026
Home शैक्षणिक बातम्या स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकतचे डी फार्मसी परीक्षेत घवघवीत...

स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकतचे डी फार्मसी परीक्षेत घवघवीत यश काॅलेजचा निकाल 100 टक्के तर कु. लहाने साक्षी 81.36 टक्के गुण मिळवून काॅलेजमध्ये प्रथम

0
1531

जामखेड न्युज—–

स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकतचे डी फार्मसी परीक्षेत घवघवीत यश

काॅलेजचा निकाल 100 टक्के तर कु. लहाने साक्षी 81.36 टक्के गुण मिळवून काॅलेजमध्ये प्रथम

संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकतचे स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकतने डी फार्मसी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने डी फार्मसी च्या उन्हाळी परीक्षा मे 2025 मध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकत चा डी फार्मसी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाचा निकाल 100 टक्के लागला आहे.

द्वितीय वर्ष गुणवंत विद्यार्थी
प्रथम क्रमांक कु. लहाने साक्षी 81.36 टक्के
द्वितीय क्रमांक कु. राक्षे दिपाली 79.91 टक्के
तृतीय क्रमांक चि. वटाणे विशाल 79.82 टक्के
चतुर्थ क्रमांक चि. मनियार रेहान 77.64 टक्के
पाचवा क्रमांक कु. लहाने वैष्णवी 77.27 टक्के
पाचवा क्रमांक कु. वाघमारे भक्ती 77.27 टक्के

डी फार्मसी प्रथम वर्ष गुणवंत विद्यार्थी
प्रथम क्रमांक चि. कोठुळे सुशेन 79.50 टक्के
द्वितीय क्रमांक कु. सय्यद सन्ना 77.00 टक्के
तृतीय क्रमांक चि. रोडे अच्युत 76.20 टक्के
चतुर्थ क्रमांक कु. नेटके कोमल 75.80
पाचवा क्रमांक कु. टेकाळे उज्वला 75.80 टक्के
सहावा क्रमांक चि. शेवाळे सचिन 75.70 टक्के


स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकत हे सन 2023- 24 पासून सुरू आहे डी फार्मसी व बी फार्मसी सुरू आहे. मे 2025 पासून काॅलेज ला परीक्षा केंद्र मंजूर झालेले आहे. या काॅलेज मध्ये जामखेड, पाटोदा, कर्जत, करमाळा व बीड परिसरातील विद्यार्थी प्रवेश घेतात गुणवत्ता पुर्ण विद्यार्थी घडविणे हेच संस्थेचे लक्ष आहे. या काॅलेज मुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.

प्राचार्य डॉ. गोरक्ष बारगजे, प्रा. रमेश डिसले, प्रा. कैलास माने, प्रा. कांचन बडे, प्रा वैष्णवी मुरूमकर, प्रा. सय्यद सन्ना, प्रा. तरन्नुम सय्यद, कार्यालयीन अधिक्षक श्रीकृष्ण पुलवळे, सतिश औटे, अशोक नेमाने हे काॅलेज च्या गुणवत्तेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.

सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे प्राध्यापक यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट, व संस्थेचे सचिव तथा जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!