जामखेड न्युज——
उपवासाने सकारात्मक उर्जा मिळते – प्रा. मधुकर राळेभात
अझरभाई काझी यांच्या घरी शिरखुर्मा पार्टी
मुस्लिम बांधव रमजान महिन्यात महिनाभर उपवास करतात याची सांगता इदगाह मैदानावर नमाजपठण करून अझरभाई काझी यांच्या घरी शिरखुर्मा पार्टीने उपवासाची सांगता होते. ही परंपरा काझी परिवाराने अनेक वर्षांपासून जपली आहे. उपवासाने सकारात्मक उर्जा मिळते यामुळे या सणाची लोक वाट पहात असतात. शिरखुर्मा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. असे प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले.
शहरातील अझरभाई काझी यांच्या घरी आज इदगाह मैदानावरून नमाजपठण करून आल्यावर शिरखुर्मा पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी
तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्रा. मधुकर राळेभात, भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात, अमित चिंतामणी, अँड. डॉ. अरूण जाधव, अमित जाधव, पोलीस उपनिरीक्षक गौतम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, प्रकाश सदाफुले, शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने, दिगंबर चव्हाण, मोहन पवार, इम्रान कुरेशी, इस्लाईल सय्यद, प्रा. लक्ष्मण ढेपे, गुलाब जांभळे, भानुदास बोराटे, नामदेव राळेभात, सुरेश जाधव, जाकीर शेख, राजूभाई खान, अरमान शेख, असिफ शेख, हाजी मंजूर साहब, हाजी जावेद बारूद, नाझीमभाई काझी, हाजी आवेद खान, जिशान शेख, सोहेल काझी, रमीझ काझी, पोपटनाना राळेभात, डॉ. विठ्ठल राळेभात सह अधिकारी पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमित चिंतामणी यांनी सांगितले की, इदगाह मैदान नमाज पठण करून अझरभाई काझी यांच्या घरी सर्व पक्षीय नेते, अधिकारी व पदाधिकारी शिरखुर्मा पार्टीसाठी येतात ही परंपरा गेल्या अनेक दिवसांपासून अविरत चालू आहे. हेच खरे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे.
यावेळी गुलाब जांभळे, भानुदास बोराटे, कैलास माने, अँड डॉ. अरूण जाधव, अशोक वीर, प्रा. मधुकर राळेभात, पोलीस निरीक्षक महेश पाटील, तहसीलदार गणेश माळी यांनी आपल्या भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नासीर पठाण यांनी केले यावेळी पत्रकारांच्या वतीने अझरभाई काझी यांनी सत्कार केला.