महावीर जयंतीनिमित्त महाश्रमणजी महाराज साहेब यांचे जामखेड नगरीमध्ये आगमन होणार

0
260

जामखेड न्युज——

महावीर जयंतीनिमित्त महाश्रमणजी महाराज साहेब यांचे जामखेड नगरीमध्ये आगमन होणार

 

जामखेड शहरात यावर्षी महावीर जयंतीनिमित्त महाश्रमणजी महाराज साहेब यांचे आगमन होणार
आहे त्यामुळे मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा होणार आहे.

जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त तेरापंथ धर्म संघ आचार्य प्रवर्तक युग प्रधान आचार्य श्री महाश्रमणजी महाराज साहेब यांचा जामखेड नगरीमध्ये आगमन होणार आहेत.


सोबतच जैन मुनि हे भारत भ्रमण वर निघालेले असताना जवळपास 100 च्या वर जैन मुनींचे जामखेड मध्ये आगमन होत आहे आपल्या जामखेड नगरीमध्ये हा सुवर्णयोग प्रथमच घडून येत आहे.

यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यापासून जामखेड वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आग्रही असून आज आचार्य श्रीजींनी मान्यता दिली व येत्या २१-४-२०२४ रोजी महावीर जयंती उत्सव निमित्त आचार्य श्रीजींचे जामखेड शहरांमध्ये आगमन होत आहे.

सोबतच असंख्य जैन मुनि व भक्त जामखेड नगरीत दाखल होणार आहेत या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे अशी माहिती श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी व सर्वच ट्रस्टींनी दिली.

तरी सर्व जामखेड वासियांना आमंत्रित आहे आपण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हा.श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ जामखेड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here