जामखेड न्युज——
मतदारसंघातील एकही गाव निधीपासून वंचित नाही – खासदार डॉ सुजय विखे पाटील
२०१९ पेक्षा जास्त मताधिक्य देणार – आमदार प्रा. राम शिंदे
मागील पाच वर्षांच्या काळात मतदारसंघात केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या प्रकारचा निधी मिळाला आहे. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा यावेळी जास्त मताधिक्य मिळेल असा विश्वास खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाची बैठक अध्यक्ष प्रा राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद,पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, रवी सुरवसे, डॉ. गणेश जगताप, सोमनाथ पाचरणे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात, बापुराव ढवळे, बाळासाहेब गोपाळघरे, शिवकुमार डोंगरे, नागराज मुरूमकर, तुषार बोथरा, पांडुरंग माने, राम पवार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक गतिमान कामे सुरू आहेत रस्ते सुसज्ज होत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्वाना बरोबर घेऊन बहुमताने विजय संपादन करणारच असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला देश कोणाच्या हातात द्यायचा यासाठी निवडणूक आहे. मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार असा सर्व कार्यकर्ते यांनी विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले की,
भारतीय जनता पार्टीने डॉ सुजय विखे पाटील यांना संधी दिली आहे. त्यामुळे मागे काय झाले हे विसरून आम्ही कामाला लागलो आहोत सहाही विधानसभा क्षेत्रात बैठकीचे नियोजन झाले आहे. आज जामखेड येथे नियोजन बैठक होत आहे. आम्ही प्रथम खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचा सत्कार केला. पाच वर्षांत काही कटू अनुभव आले याची समाधान कारक उतरे मिळाली त्यामुळे २०१९ पेक्षा जास्त मताधिक्य देऊ असा विश्वास व्यक्त केला.
आमचे मत खासदार विखे यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना जाणार आहे. त्यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी विखे पाटील यांना जादा मताधिक्य देणारच असा विश्वास व्यक्त केला. पक्षाचा आदेश सर्वोच्च आहे. तो आम्ही पाळणारच असेही सांगितले.