जामखेड न्युज——
संचालक विष्णू भोंडवे यांच्या घरी आमदार प्रा राम शिंदे यांची सदिच्छा भेट

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू भोंडवे यांच्या घराची सोमवारी घोडेगाव येथे वास्तुशांती होती यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी भोंडवे यांच्या घरी सदिच्छा भेट देत कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
आमदार प्रा राम शिंदे हे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सुख दु:खात सहभागी होत असतात. आपल्या कार्यकर्त्यांना खुप सन्मान देतात. यामुळे कार्यकर्तेही आपल्या नेण्यासाठी जीवाचे रान करतात. आज आपला निष्ठावंत कार्यकर्ता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू भोंडवे यांच्या घराची वास्तुशांती होती यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी भेट देत भोंडवे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांच्या बरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, रवी सुरवसे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिंवसरा,

बाजार समितीचे संचालक विष्णु भोंडवे, नंदु आबा गोरे, संचालक हुलगुंडे, गोरख घनवट, युवा नेते शंकर भोंडवे, आशोक मुळे, सहसचिव ढगे, राळेभात, आशोक यादव माजी सरपंच अंगद गव्हाळे, माजी उपसभापती अरुण आप्पा भोसले,बाजार समितीचे संचालक डॉ ससाणे, उदयसिंह पवार पाटील यांच्या सह अनेक मान्यवर व घोडेगाव येथील ग्रामस्थां मोठ्या संख्येने उपस्थित होते






