जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात नऊ नवीन नोटरी अधिकारी
जामखेड तालुक्यात आगोदर दोन वकिल नोटरी अधिकारी म्हणून काम पाहत होते. आता नवीन नऊ
वकिलांची नोटरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. असे एकूण अकरा नोटरी अधिकारी असणार आहेत.
जामखेड तालुक्यात भारत सरकार नोटरी अधिकारी म्हणून नवीन 9 वकिलांची नियुक्ती केली आहे यामध्ये ॲड. प्रमोद राऊत, अँड. प्रवीण सानप, अँड.प्रसाद गोले, अँड. गणेश पाटील, अँड.संग्राम पोले, अँड.अमर कोरे, अँड.भगवान जायभाय, अँड. दिलीप वारे, अँड.शाहूराव वाळुंजकर यांची नियुक्ती झाली आहे.
तसेच आगोदर अँड बंकट बारवकर, व तानाजी पाटील पवार हे दोन वकील नोटरी अधिकारी तर आता नऊ वकील नोटरी अधिकारी असे अकरा नोटरी अधिकारी जामखेड साठी झाले आहेत.
पूर्वी तालुक्यात भारत सरकारची 1आणि राज्य शासनाची 1अशा एकूण 2 नोटरी अधिकारी कार्यरत होते.त्यामुळें जामखेड तालुक्यात ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना अडचणी निर्माण होत होती. यासाठी सामाजिक कार्यात सक्रिय वकिलांची नेमणूक झाल्यामुळे तालुक्यातील जनतेकडून अभिनंदन होत आहे, तसेच पूर्वी कमी नोटरी संख्या असल्यामुळे कमिशन एजेंट कडून लोकांची आर्थिक फसवणुक होत होती. त्याला आता लगाम लागणार आहे.
नवीन 9 वकिलांची नोटरी अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.त्यामुळे नऊ नोटरी अधिकाऱ्यांमुळे जनतेला आता आर्थिक त्रास होणार नाही, नवीन नोटरी अधिकारी यांचा जामखेड वकील संघ कडून अभिनंदन करण्यात येत आहे.