जामखेड न्युज——
फक्राबाद गावातील शेतकरी सुपुत्रांचे स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील शेतकरी कुटुंबातील कु. शुभांगी धनंजय राऊत हिची ग्राम महसूल विभागात तलाठी पदी निवड व चि. विशाल महादेव सातव यांची कृषी सहाय्यक नाशिक विभाग पदी निवड झाल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच परिसरातील युवकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
शेतकऱ्याची मुल स्पर्धा परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी पास होऊन निवड झाल्याबद्दल, शुभांगी हिची तलाठी पदी निवड झाल्याबद्दल व विशाल याची कृषी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल फक्राबाद गावात व पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. आज फक्राबाद येथील ग्रामस्थानी दोघांचा ही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून, अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रामुख्याने दोघांनी ही फक्राबाद सारख्या ग्रामीण भागात राहून, गावातील जि. प. प्राथमिक शाळा फक्राबाद मध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर श्री. आणखेरी देवी विद्यालय फक्राबाद या ठिकाणी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले होते त्यामुळे दोन्ही शाळेंच्या वतीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
शुभांगी हिने १० वी नंतर चे शिक्षण दादा पाटील महाविद्यालय , कर्जत या ठिकाणी पूर्ण केले होते व तेथूनच तीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती. तिचे सध्या तलाठी पदी निवड झालेली आहे परंतु तिची PSI (पोलीस उपनिरीक्षक) होण्याची इच्छा असल्याने ती तलाठी पदासाठी काम करत असताना सोबतच पुढील अभ्यास सुरु ठेवणार आहे. असे सांगूतले.
विशाल ने उच्च माध्यमिक शिक्षण आरणगाव या ठिकाणी पूर्ण केले व नंतर BSC Agri चे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली व कृषी सहाय्यक पदी निवड झाली.
शेतकरी घरातील मुलांनी भराघोस यश मिळवले त्यामुळे आई वडील नातेवाईक ग्रामस्थ , शिक्षक, सर्वच स्थारांवरून अभिनंदन होत आहे.
या दोघांनी गावातील लहान मुलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्यांनी शाळेतील मुलांना स्पर्धा परीक्षांचे महत्व व अभ्यास कसा करावा यावर मार्गदर्शन केले. तसेच गावातून आणखीन ऑफिसर तयार व्हावेत म्हणून युवा वर्ग यांच्या साहाय्याने गावात स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे मार्गदर्शन केंद्र व स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी एक अभ्यासिका सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे.