जामखेडचे जरांगे पाटील म्हणजे पांडुरंग भोसले विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व चाळेखोर भास्करला धडा शिकविण्यासाठी सात दिवसांपासून उपोषण

0
1331

जामखेड न्युज——

जामखेडचे जरांगे पाटील म्हणजे पांडुरंग भोसले

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व चाळेखोर भास्करला धडा शिकविण्यासाठी सात दिवसांपासून उपोषण

 

डॉ. भास्कर मोरेच्या रत्नदीप मेडिकल फाउंडेशन
कॉलेजच्या पिळवणूकीच्या संबंधित गेल्या सहा
दिवसापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन व शिवप्रतिष्ठान चे उपोषण सुरू आहे. याच अनुषंगाने नाशिक व रायगड विद्यापीठाने केलेल्या तपासणीत चक्क मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थीना राहण्यासाठी होस्टेल म्हणून मंगल कार्यालयात ठेवण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे या संस्थेत कीती सावळा गोंधळ सुरु आहे हे लक्षात आले आहे. या कुकृत्य करणारे चाळेखोर भास्करला धडा शिकविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरु आहे. पांडूरंग भोसले म्हणजे जामखेडचे जरांगे पाटील पाटील आहेत अशीच चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या नुसार दि ९ मार्च रोजी
रत्नदीप मेडिकल कॉलेज व नर्सिंग होम साठी डॉ.
बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जि. रायगडचे व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
नासिकचे कमिटी सदस्य यांना रत्नदीप मेडिकल
कॉलेजच्या तपासणी मध्ये आनेक त्रुटी आढळून
आल्या. तसेच या ठिकाणी धक्कादायक बाब म्हणजे समितीला नर्सिंग कॉलेज देखील आढळून आले नाही. समितीने रत्नदीप मेडिकल कॉलेजची तपासणी केली या मध्ये आनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या. तसेच समिती कॉलेज तपासणीसाठी आली असता संस्थेच्या आडमुठेपणा मुळे चक्क चौकशी समितीला दोन तास कॉलेजच्या पायऱ्यांवर बसावे लागले.

कॉलेज तपासणी झाल्यानंतर सदरची समिती ही मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थीचे हॉस्टेल तपासणी करण्यासाठी गेल्यावर मात्र या समितीला धक्कादायक प्रकार पहावयास मिळाला चक्क रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याने उद्याचे डॉक्टरकीचे स्वप्न पहाणाऱ्या (BAMS) च्या ३२ विद्यार्थीनींचे होस्टेल म्हणून चक्क मंगल कार्यालयात राहण्यासाठी ठेवले होते.

मंगल कार्यालयात या विद्यार्थांची रहाण्याची सोय करुन लाखो रुपये होस्टेलच्या नावाखाली विद्यार्थींन कडुन घेतले होते. या ठिकाणी कसलीही पिण्याच्या पाण्याची, आंघोळीची व शौचालयाची स्वतंत्र सोय केलेली आढळून आली नाही.

तसेच विद्यार्थीच्या पिण्याच्या पाण्याची सोय देखील
याठिकाणी केलेली आढळून आली नाही. याबाबत तरी चौकशी समिती आता या संस्थेच्या चालकासह
कॉलेजवर कारवाई करणार का हे पहावे लागणार
आहे.


रत्नदीप मेडिकल फौंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरेचे कुकृत्य एखाद्या सैतानला लाजवेल असे असून त्याने केलेल्या शारीरिक व मानसिक, अर्थिक छळ मुळे अनेक मुलं मुली नैराश्याच्या गर्तेत सापडली असून भास्कर मोरेला अटक न केल्यास आमच्या जीवीताला धोका असल्याच्या भावना व्यक्त करत आमचे दुसऱ्या मेडिकल काॅलेजकडे वर्ग करावे, अन्यायकारक रितीने घेतलेले पैसे परत करणे व भास्कर मोरेला अटक करून आम्हाला न्याय द्यावा अश्या मागण्या सर्वच विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दि. ११ मार्च रोजी कर्जत जामखेडचे आमदार आ. रोहीत पवार यांनी रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या विविध फॅकल्टीच्या शेकडो अंदोलकांची अंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली व त्यांच्या भावना जाणून घेतल्या. व त्यांचा योग्य न्याय दिला जाईल असा विश्वास दिला. तसेच उपस्थित पोलीस अधिकारी, तहसीलदार, वनविभागाचे अधिकारी, आलेली आरोग्य विद्यापीठाची समीती यांना योग्य त्या सूचना दिल्या.

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना सांगितले की, भास्कर मोरेकडून हा आम्हा विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक, अर्थिक छळ केला जातो. जनरल, युनिफॉर्म, बसभाडे, मेस, वसतीगृह यासाठी अमाप पैसा वसूल करतो, याठिकाणी पुरेसे शिक्षक नाहीत. प्रॅक्टिकल नाही. S., C. ची पुर्ण स्काॅलरशीप घेतली जाते. इन्टरशिपसाठी हाॅस्पिटल नाही. स्टाफ, पेशंट, रिसेप्शन म्हणून मुलांनाच पुढे केले जाते. सनासुदीला सुट्टी दिली जात नाही. स्टुडंट नाही तर लेबर म्हणून राबवले जाते.

अशा या कृरकर्मा भास्करला संपविण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पांडुरंग भोसले मैदानात उतरले आहेत त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाला जोश निर्माण झाला आहे आतापर्यंत भास्करने साम दाम दंड याद्वारे अनेक आंदोलने मोडित काढलेली आहेत पण यावेळी पांडुरंग भोसले यांनी आंदोलनात उडी घेतल्या मुळे अनेक मुली तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here