जामखेड न्युज——
गुणवंत विद्यार्थ्यांची हैदराबाद येथे शैक्षणिक सहल
जामखेड मधील दोन विद्यार्थी

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यात गुणवत्ता यादीत आलेल्या सुमारे चाळीस विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे उपक्रमशिल पाच शिक्षक अशा एकुण पंचेचाळीस जणांची शेक्षणिक सहल हैदराबाद येथे रवाना झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेतून पाचवीचे पहिले दहा व उत्तरेतून पहिले दहा तसेच आठवी मधुनही दक्षिण अहमदनगर पहिले दहा व उत्तर अहमदनगर पहिले दहा असे एकूण चाळीस विद्यार्थी व पाच शिक्षक यांची शैक्षणिक सहल हैदराबाद येथे गेली आहे.

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागली आहे. या शैक्षणिक सहलीसाठी पाचवी मधुन नगर दक्षिणेतील दहा विद्यार्थ्यांपैकी जामखेडचे दोन विद्यार्थी आहेत. जिया सुनिल भामुद्रे व शंभूराजे केशवराज कोल्हे यांची निवड झाली आहे.

यांना हैदराबाद येथे शैक्षणिक सहलीसाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, विस्तार अधिकारी जाधव एस. के, नरवडे एस. के, केंद्रप्रमुख, केशव गायकवाड, सुरेश मोहिते, राम निकम, विक्रम बडे, नवनाथ बडे यांच्या सह सर्वच अधिकारी, पदाधिकारी शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

इ.5 वी शिष्यवृत्ती परीक्षा2022-23 मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत पहिले 10 विद्यार्थी बाहेर राज्यात शैक्षणिक सहलीसाठी निवड झाले आहेत. ती सहल हैद्राबाद येथे जामखेड मधून जात असताना त्या सहलीमध्ये जामखेड तालुक्यातील सुनिल (मामा) भामुद्रे यांची कन्या जिया सुनिल भामुद्रे जि.प.प्राथ.शाळा पवारवस्ती, व केशवराज कोल्हे यांचे चिरंजीव शंभूराजे केशवराज कोल्हे जि.प.प्राथ.शाळा लटकेवस्ती यांची निवड झाली आहे.

जिया व शंभूराजे त्यांचे शिक्षक बाळासाहेब जरांडे, अनिता पवार (पिंपरे ) मॅडम त्यांच्या शाळा आणि भामुद्रे आणि कोल्हे परिवार त्याच बरोबर सहल प्रमुख आमचे मित्र बाळासाहेब दिघे सर,रविंद्र भापकर सर, सतिष भालेकर सर या सर्वांचा सन्मान करतांना केंद्रप्रमुख केशव गायकवाड साहेब, संचालक संतोषकुमार राऊत, विश्वस्त मुकुंदराज सातपुते,जिल्हाकार्याध्यक्ष एकनाथ(दादा) चव्हाण, दक्षिण जिल्हा प्रमुख केशवराज कोल्हे, जामखेड गुरूमाऊली सदिच्छा मंडळ अध्यक्ष अविदादा नवसरे, नवनाथ बहिर, सुनिलमामा भामुद्रे, बाळासाहेब जरांडे, विजय चौधरी,टेमकर सरआणि जिया,शंभू यांना व सर्वच अहमदनगर जिल्हयातील मुलांना प्रवासासाठी शुभेच्छा देतांना प्राथ. शिक्षक संघ व गुरूमाऊली-सदिच्छा मंडळ जामखेड टिम सहलीसाठी सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.


