पुणे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा, पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

0
247

जामखेड न्युज——

पुणे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा, पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

 

नवी दिशा, नवे उपक्रम राज्यस्तरीय शैक्षणिक समूहाच्या वतीने दिनांक ९ मार्च २०२४ ला राजीव गांधी ई -लर्निंग स्कूल सहकार नगर पुणे. येथे शतक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे या पुस्तकाचे प्रकाशन तसेच महाराष्ट्रातील १०३ गुणवंत शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात मोठ्या थाटात पार पडला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन मा.श्रीम. शुभांगी चव्हाण उप प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग (प्राथ) पुणे मनपा, प्रमुख अतिथी मा.श्री आबा उर्फ उल्हास बागुल उपमहापौर, नगरसेवक पुणे मनपा.मा.डॉ.शोभा खंदारे सहसंचालक SCERT पुणे. मा.श्री.सचीन डिंबळे कार्यकारी राज्याध्यक्ष मनपा,नप प्राथमिक शिक्षक संघ.मा.श्रीम.विजया महाडिक मॅडम सेवानिवृत्त शिक्षिका पुणे या मान्यवरांच्या उपस्थितीत सदर सोहळा संपन्न झाला.

नवी दिशा नवे उपक्रम राज्य स्तरीय शैक्षणिक समूह सन २०१७ पासून महाराष्ट्रातील शिक्षकांना उपक्रम व दिशा देण्याचे काम करीत आहे. सोबतच शिक्षकांच्या नवोपक्रमाला न्याय,प्रसार करण्यासाठी दरवर्षी एक प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तक प्रकाशित केले जाते.२२ जानेवारी २०२३ रोजी पुणे येथे महाराष्ट्रातील एकूण ५० शिक्षकांनी राबविण्यात आलेल्या नवी दिशा नवे उपक्रम पुस्तक प्रकाशित झाले तसेच या ५० नवोपक्रमशील शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले.यावर्षी १०३ गुणवंत शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांनी राबविलेले उपक्रम एकत्रित करून “शतक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या समूहाचे कर्तव्यदक्ष, उपक्रमशील संयोजक, सोहळ्याचे आयोजक तथा संपादक श्री.देवराव चव्हाण यांच्या नवं संकल्पनेतून शिक्षकांच्या उत्थानासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दरवर्षी समूहाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम जाणीवपूर्वक आयोजित केले जातात.

सदर समूह महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक नवसंजीवनी ठरत असून शिक्षकांना दिशा देणारा हा महाराष्ट्रातील पहिला आगळावेगळा समूह निश्चितच आहे.

वरील सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री.बळीराम जाधव श्री.आयुब शेख व इतर सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here