जामखेडमध्ये कलाकेंद्र ठरतायेत गुन्हेगारांचे अड्डे ?

0
1991

जामखेड न्युज——

जामखेडमध्ये कलाकेंद्र ठरतायेत गुन्हेगारांचे अड्डे ?

 

जामखेड कलाकेंद्रासाठी प्रसिद्ध आहे. शासनाने नियम पायदळी तुडवत आर्थिक फायद्यासाठी अनेक अनाधिकृत व्यवसाय केले जातात. लोककलेऐवजी डीजेचा थयथयाट असतो तसेच वेळेच्या नियमांचे कसलेही बंधन पाळले जात नाही. तसेच अनेक गुन्हेगारांना आश्रय देण्याचे काम कलाकेंद्र चालक करतात मागील आठवड्यात पाटोदा गरड येथे गोळीबार करणाऱ्या गुंडाला कोणी गाडी पुरवली कोण आर्थिक मदत करत होते. खोलवर चौकशी केली तर याचा संबंध कलाकेंद्राशीस येत आहे. आणि जामखेड पोलीसांचे या गोष्टी कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे.

काही वर्षापूर्वी जामखेड बीड रोडवरील कलाकेंद्रा विरोधात मोहा ग्रामस्थ एकवटले होते ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यांचे मत असे होते की, कलाकेंद्रा मुळे परिसरात अनेक अवैध व्यवसाय, तसेच गुन्हेगारी वाढीस लागली आहे. अनेक दिवस कलाकेंद्र बंद होते कलाकेंद्र चालक कोर्टात गेले तेव्हा कलाकारांचा विचार करून काही नियम व अटीवर कलाकेंद्रांना परवानगी दिली काही दिवस नियम व अटींचे पालन केले परत आता शासनाचे नियम व अटी पायदळी तुडवल्या जात आहेत.

परिसरात कलाकेंद्रा मुळे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. अवैध दारू विक्री, गुटखा विक्री, झुगार, वेळेची मर्यादा न पाळणे, कलेऐवजी डीजेचा थयथयाट, मटका, वेशाव्यवसाय, लाँजींग तसेच जामखेड सह बीड, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील अनेक गुंड येथे आश्रय घेतात. गुंडांना आर्थिक पाठबळ काही कलाकेंद्र चालक पुरवितात आणि पोलीसांचे या सर्व बाबीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे.


कलाकेंद्राच्या नावाखाली अनेक अनाधिकृत व्यवसाय तसेच मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी फोफावलेली आहे. वेश्या व्यवसाय करण्यासाठी राज्यातील अनेक मुलींना पैशाचे आमिष दाखवून आणले जात आहे असे एका पिडीत मुलीच्या आईने जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

आठ महिन्यापुर्वी एका अनाधिकृत कलाकेंद्रात
उस्मानाबाद (धाराशिव) येथे मेडिकलचे उच्च फार्मा डीचे शिक्षण घेत असलेल्या मुलीची अशीच एका दलालाशी भेट झाली अनेक आमिषे दाखवत जामखेड येथील एका कलाकेंद्रात आणले मुलीचे आई वडील मुलीच्या शोधात सगळीकडे फिरत होते. शेवटी जामखेड चा पत्ता लागला तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला होता.


कलाकेंद्र चालक हे अनेक मुलींना आर्थिक अमिषे दाखवत या नरकात ढकलत आहेत. याचे संपूर्ण महाराष्ट्रात एक रँकेट आहे. अनेक दलाल कमिशन वर हा धंदा करतात. आणि अनेक मुलींचे आयुष्य बरबाद करतात.

चौकट
जामखेड परिसरातील काही कलाकेंद्र चालक
दादागिरी तसेच प्रशासनातील काही लोकांना हप्ते देऊन राजरोसपणे अवैध धंदे चालवतात. शासनाचे नियम धाब्यावर बसवतात.  मोठ्या प्रमाणात अवैध धंदे करतात. पोलीसांचे मात्र या सर्व बाबीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here