जामखेड न्युज——
शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या कडून अरणगावचे सरपंच लहू शिंदे सन्मानित
जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतीस
घरकुल योजनेचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण केल्याबद्दल
नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळाला यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी अरणगाव ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली यावेळी सरपंच लहू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अभिमान घोडेस्वार, कामिनी राजगुरू, सिद्धेश्वर निर्मला तसेच अरणगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
आतापर्यंत अरणगाव ग्रामपंचायतीस एकुण आठ पुरस्कार मिळाले आहेत. घरकुल योजनेचे दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण केल्याबद्दल नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल आज अरणगाव ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली व सरपंच लहू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
सरपंच अकुंश शिंदे व लहू शिंदे हे सतत जनतेच्या सेवेत असतात शासकीय योजना प्रभावीपणे राबवत गोरगरीब वंचित जनतेस लाभ मिळवून देतात. यामुळे आतापर्यंत सोळा लाखाचे पुरस्कार मिळाले आहेत.
आतापर्यंत अरणगाव ग्रामपंचायतीस आठ विविध पुरस्कार मिळाले आहेत.
१) महात्मा ज्योतिबा फुले जलयुक्त शिवार अभियान पुरस्कार
२) स्वच्छ भारत मिशन ग्रामीण (निर्मल ग्राम केल्याबद्दल पुरस्कार) 3 लाख रुपये
3) पाणी फौंडेशन पुरस्कार तालुका तिसरा क्रमांक 3 लाख रुपये
४) स्मार्ट ग्राम पुरस्कार 10 लाख रुपये
५) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जलमित्र पुरस्कार
६) समाज गौरव पुरस्कार (रत्नदीप मेडिकल फौंडेशन)
७)सरपंच कोविड योद्धा पुरस्कार
८) नाशिक विभागात प्रथम क्रमांक ( घरकुल योजनेचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण)
अशा प्रकारे आतापर्यंत आठ वेगवेगळे पुरस्कार मिळाले असून सोळा लाख रुपये ग्रामपंचायतीस मिळवून दिले आहेत. याबद्दल सन्मान करण्यात आला.