जामखेड न्युज——
शिक्षकनेते राम निकम यांना पितृशोक
माणिकराव निकम पाटील यांचे वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन
शिक्षकनेते व केंद्रप्रमुख राम निकम यांचे वडील
माणिकराव यादवराव निकम पाटील नव्वदव्या वर्षी राहणार शिरूर तालुका जामखेड यांचे आज वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. अंत्यसंस्कार चार वाजता शिऊर येथे होणार आहेत.
माणिकराव यादवराव निकम पाटील त्यांचा जन्म 22 ऑगस्ट 1934 रोजी झाला त्यांना चार मुले व एक मुलगी व पत्नी आहे. ते शिवरगावचे 38 वर्ष पोलीस पाटील म्हणून काम पाहत होते.
ते धार्मिक वृत्तीचे होते दरमहा पंढरपूरची वारी करत असत गावांमधील सर्व भांडण तंटे व वाद विवाद निस्वार्थपणे मिटवत असत त्यांचा मोठा मुलगा शेती व्यवसाय व इतर तीन मुले नोकरी करत आहेत जावई हे देश सेवेसाठी सैनिक मध्ये आहेत.
शिक्षण नेते व केंद्रप्रमुख राम निकम यांच्या पत्नी सीमा क्षिरसागर (निकम) या शिक्षक बँकेच्या चेअरमन होत्या.
अंत्यविधी आज दिनांक 9 मार्च 2024 रोजी सायंकाळी चार वाजता शिऊर तालुका जामखेड येथे होईल त्यांना शिक्षक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.