जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात शिक्षण क्रांतीचा सारोळा शाळेने रोवला मानाचा तुरा
शिक्षण विभाग आपल्या दारी या अभिनव संकल्पनेतून जामखेड तालुक्यातील शिक्षण क्रांतीचे प्रणेते, कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकरी आदरणीय श्री. बाळासाहेब धनवे यांनी जामखेड पंचायत समिती शिक्षण विभाग टीमसह आज बुधवार,दि.6 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा शाळेला सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात अहमदनगर जिल्ह्यात सारोळा शाळेने द्वितीय क्रमांक संपादन करत पाच लाख रूपये बक्षिसांचे मानकरी ठरल्याबद्दल,सारोळा शाळेचे मुख्याध्यापक श्री.शहाजी जगताप सर, पदवीधर शिक्षक श्री.माजीद शेख सर श्री.राहुल लिमकर सर, उपाध्यापक श्री. खंडेराव सोळंके सर,श्री.प्रशांत होळकर सर,सौ.शबाना शेख मॅडम,सौ.अमृता रसाळ मॅडम यांचा फेटा,शाल व गुलाबपुष्प सह यथोचित सन्मान श्री.धनवे साहेब व सहकारी टीमच्या वतीने करण्यात आला.
तसेच सरपंच सौ. रितुताई काशिद,श्री.अजयदादा काशिद,उपसरपंच श्री.हर्षद मुळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.किशोर सातपुते,उपाध्यक्ष श्री.राजेंद्र आजबे व सर्व ग्रामस्थ टीमचे विशेष अभिनंदन यावेळी साहेबांनी मनोगत व्यक्त करताना केले.तसेच NMMS परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा,मंथन परीक्षा या शालेय स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांना जिलेबी भरवत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली.
या कार्यक्रम प्रसंगी जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री.बाळासाहेब धनवे साहेब,जामखेड बीट शिक्षण विस्तार अधिकारी तथा राजुरी केंद्रप्रमुख श्री.सुरेश मोहिते, अरणगाव केंद्रप्रमुख श्री.विक्रम बडे, खर्डा व तेलगंशी केंद्रप्रमुख श्री.केशव गायकवाड, पाटोदा केंद्रप्रमुख श्री.राम निकम, विकास मंडळ विश्वस्त तथा वाकी शाळेचे मुख्याध्यापक श्री.मुकंद सातपुते, बसरवाडी शाळेचे मुख्याध्यपक श्री एकनाथ चव्हाण सर, तपनेश्वर शाळेचे उपाध्यापक श्री.प्रताप पवार सर,श्री.सोनवणे सर,श्री.मडके सर ,सारोळा ग्रामस्थ प्रतिनिधी श्री.शहाजी नाना पवार तसेच सारोळा शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.