राज्यस्तरीय परीक्षेत तेलंगशी शाळेची अमृता चौधरी राज्यात प्रथम गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले कौतुक

0
623

जामखेड न्युज——

राज्यस्तरीय परीक्षेत तेलंगशी शाळेची अमृता चौधरी राज्यात प्रथम

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले कौतुक

राजर्षी शाहू महाराज संस्था खोंदला ता.कळंब जि.धाराशिव यांच्या वतीने 25 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मी ज्ञानी होणार या सामान्य ज्ञानावर आधारित राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत जि.प.प्रा.शाळा तेलंगशी ता.जामखेड या शाळेतील इ.सातवीची विद्यार्थीनी कु. अमृता कल्याण चौधरी या विद्यार्थीनीने 50 पैकी 50 गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याबद्दल गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे तसेच अनेकांनी अभिनंदन केले आहे.


तर दिक्षा तानाजी ढाळे 43,समृद्धी राजेंद्र ढाळे 41,संकेत बाजीराव पठारे 41,सुमीत गोपीनाथ ढाळे 38 व गणेश केशव जायभाय 33 गुण घेऊन चमकदार कामगिरी केली आहे.

26 जून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती पासून ते 12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती पर्यंत हा उपक्रम दररोज घेण्यात आला.दररोज सामान्य ज्ञानावर आधारित पाच दर्जेदार प्रश्न देऊन प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी परीक्षा घेतली जाते.यासाठी संस्थेचे सदस्य सचिन लांडगे सर हे प्रश्ननिर्मितीचे कार्य करतात. उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वृंद्धिगत होऊन अभ्यासात सातत्य राहते व वाचनाची आवड तयार होते. विविध स्पर्धा परीक्षेची तयारी होण्यासही मदत होते.

अमृता,सर्व गुणवंत विद्यार्थी,पालक व शिक्षक यांचे जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब,खर्डा बीट विस्तारअधिकारी संजय नरवडे साहेब,नान्नज बीट विस्तारअधिकारी सुनील जाधव साहेब, केंद्रप्रमुख केशव गायकवाड साहेब, संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे सर,सचिव गणेश नागरगोजे सर,तेलंगशी सरपंच कविता ढाळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत जायभाय यांच्यासह पालक व ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक आनंद राऊत ,आनंता गायकवाड,संतोष गोरे,सुशेन चेंटमपल्ले,विजयकुमार रेणुके,लक्ष्मी जायभाय ,अशोक जाधव व रविंद्र धस यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here