जामखेड न्युज——–
जामखेडमध्ये डॉ. संजय भोरे यांच्या हस्ते पल्स पोलीओ लसीकरण शुभारंभ
सनराईज शैक्षणिक संकुलच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यात परिसरात ठसा निर्माण करणारे
प्रयत्न हाॅस्पिटलचे संचालक डॉ संजय भोरे यांनी धन्वंतरी च्या प्रतिमेला पुष्पहार घालून जामखेड मध्ये पल्स पोलीओ योजनेचा शुभारंभ केला.
प्रयत्न हाॅस्पिटल तपनेश्वर रोड जामखेड येथील महाराष्ट्र शासनाच्या पल्स पोलीओ सेटंर येथे पल्स पोलीओ लसीकरण करणाचा शुभारंभ प्रयत्न हाॅस्पिटलचे संचालक डॉ संजय भोरे यांनी धन्वंतरी च्या प्रतिमेला पुष्पहार घालून केले
वंचित बालकांना घरी जावून दिला जाणार डोज ३ मार्च रोजी पोलिओ डोजपासून वंचित राहिलेल्या शहरी भागातील पाच वर्षा आतील बालकांना ४ ते ९ मार्च दरम्यान तसेच ग्रामीण भागातील बालकांना ४ ते ६ मार्च या कालावधीत घरोघरी जावून पोलिओ डोज पाजण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
जागतिक आरोग्य संघटनेने १९९८ सालापासून ‘पल्स पोलिओ’ची मोहीम सुरू केली. दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारीत ‘पोलिओ रविवार’ साजरे केले गेले. लोकांच्या घरोघर जाऊन ‘पोलिओ रविवार’च्या नंतरच्या आठवडय़ात ५ वर्षांखालील मुलांना पोलिओ डोस पाजले गेले.
पल्स पोलिओ ही भारतातील पोलिओमायलाइटिस (पोलिओ) नष्ट करण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेली एक लसीकरण मोहीम आहे जी पाच वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ विषाणूविरूद्ध लसीकरण करून देते. हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात, पल्स लसीकरण कार्यक्रम आणि पोलिओमायलिटिस प्रकरणांवर देखरेख करून पोलिओशी लढतो.