जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज हे आठरापगड जमातीमधील मावळ्यांचे होते. तसेच राजर्षी शाहू महाराज यांनी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व मराठा समाज असे मिळून ५० % आरक्षण दिले होते. परंतू कालांतराने केंद्र सरकारने नेमलेल्या कही कमीट्यांच्या अहवालामुळे मराठा आरक्षण गेले.आरक्षण ही कायदेशीर प्रक्रिया आहे. सत्तर टक्के मराठा समाज गरीब आहे. यांना आरक्षणाचा लाभ मिळावा मात्र सद्या सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये चाललेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे समाजात गैरसमज होऊन अपप्रकार होऊ नयेत यासाठी मी हा संवाद दौरा काढला असल्याचे प्रतिपादन छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी केले.
मराठा आरक्षण अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची सध्यस्थीती, सारथी या संस्थेची सध्यस्थीती, तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध योजना अशा विविध विषयांवर प्रबोधन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, लोकनेते, खासदार छत्रपती संभाजी राजे हे जामखेड येथे आले होते. शुक्रवार दि. २ रोजी दुपारी १२ : ३० वाजता नगरपरिषद समोरील प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले.
यावेळी विविध पक्षांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वागत करण्यात आले. भाजपच्या वतीने माजी मंत्री भाजपाचे उपाध्यक्ष राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, राहुल उगले(राष्ट्रीय काँग्रेस), संजय काशीद (शिवसेना), सचिन उगले (प्रहार संघटन) मंगेश आजबे (स्वाभिमानी शेतकरी संघटना) हवा सरनोबत, प्रदीप टापरे (मनसे) यांचा समावेश होता. तर सभापती सूर्यकांत मोरे, विकास राळेभात, ॲड. अरुण जाधव, शरद शिंदे, ,नामदेव राळेभात, कुंडल राळेभात, पवन राळेभात, प्रा. लक्ष्मण ढेपे, अवधूत पवार, राम निकम आदी मान्यवरांसह सर्व बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवश्री छत्रपती संभाजी महाराज यांना जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्मान पत्र व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने खरीप हंगामात पिकणाऱ्या तूर उडीद व सोयाबीन या धान्यांचे सॅम्पल देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड कर्जत विधानसभा क्षेत्र प्रमुख मधुकर राळेभात, जामखेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समिती सभापती राजश्री मोरे, सूर्यकांत नाना मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी कोविड महामारीने जगात थैमान घातले आहे तेव्हा प्रत्येकाने मास्क वापरा कोविड नियमांचे पालन करा असा सल्ला जनतेला दिला.