जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
‘माझा दादा आजच्या पिढीसाठी विठ्ठलाचा अवतारच आहे…अवघ्या महाराष्ट्रातील युवकांसाठी ऊर्जा आणि प्रेरणेचे भांडार आहे…माझ्या विठ्ठलाने सर्वांसाठी केलेल्या मदतीचा महिमा एका शब्दात कसा सांगु?
मुंबई गोरेगाव ते कर्जत-जामखेड हे शेकडो किमीचे अंतर पायी पार करून आ.रोहित पवार या आपल्या विठ्ठलाच्या भेटीला आलेल्या संदीप पडघन या युवकाचे हे उद्गार प्रत्येकालाच थक्क करणारे आहेत. ‘देव दगडात नाही माणसात आहे’ या वाक्याचा साक्षात्कार झालेला संदीप ‘एक वारी माझ्या विठ्ठलाची’ ही पताका घेऊन आ. रोहित पवारांच्या समाजसेवेच्या कार्याची बीजे रोवत आला आहे.त्याच्या या निस्सीम भक्तीपुढे आ.रोहित पवारही भावुक झाले.
संदीप हा मूळचा वाशीम जिल्ह्यातील असुन सध्या गोरेगाव मुंबई येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला आहे.पुरसदृश परिस्थिती असो वा कोरोनाचा आत्मघातकी काळ असो आ.रोहित पवारांनी मतदारसंघच नव्हे तर राज्यात पुरवलेली निस्वार्थी मदत प्रत्येकाच्या लक्षात राहणारी आहे.त्यांच्या या कामाचे मोल फिटणार नाहीत.त्यामुळेच माझ्या विठ्ठलाच्या सन्मानासाठी ही पायी वारी केल्याचे संदीप सांगतो.मुंबईहुन बारामती येथे पायी येऊन आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचे दर्शन घेत त्याने रोहित पवारांच्या संस्कारांचे नकळत अनुकरण करत निष्ठा, प्रेम, सेवाभावाचे दर्शन घडवले.त्याच्या या आदराने सुनंदा पवारही भारावून गेल्या.त्यानंतर बारामती ते कर्जत हा प्रवास पायी पुर्ण करत आ.रोहित पवार आणि संदीप यांची कर्जत येथे झालेली ‘कृष्ण-सुदामाची’ गळाभेट प्रत्येकाच्या पापण्या ओल्या करणारी ठरली.आ. रोहित पवार यांच्या कामावर प्रभावित होऊन राज्यभरातील युवकांनी आणि महिलांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी केलेली अनेक व्रते, संकल्प अवघ्या राज्याने पाहिले आहेत. त्या सर्वांची इच्छापूर्ती करण्यासाठी आ.पवारांनीही आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राज्यात फडकवला.आ. रोहित पवारांवर प्रेम करणारी अनेक मंडळी राज्यभर विखुरलेली आहेत.असे असले तरी राज्यभरातील युवकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रत्येकवेळी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले आहे.