जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
येथील सदाफुले वस्तीवर अवैध सावकारकी होत असल्याची माहिती सहकार खात्याला मिळाली यानुसार सहकार खात्याने गुरूवारी छापा घालून या कारवाईत संशयास्पद कागदपत्रे आढळून आल्याने सहकार खात्याने अवैध सावकारकी अधिनियम कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती तालुका सहाय्यक
निबंधक देविदास घोडेचोर यांनी दिली. यामुळे परिसरात अवैध सावकारकी करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
अन्सार युसूफ पठाण रा. सदाफुले वस्ती, जामखेड याच्या विरोधात अवैद्य सावकारकी करत आसल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नगर यांच्या कार्यालयात दाखल झाली होती. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम अन्वये कारवाई करण्याकरीता सहायक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांना कळवले होते. त्या नुसार सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी कलम 16 अन्वय कारवाई करणे कामी अवैद्य सावकाराच्या घराची झडती घेण्या करीता पथक नेमले सदर पथकात साहेबराव पाटील सहकार अधिकारी प्रथम श्रेणी हे पथक प्रमुख, अलताफ शेख सहकार अधिकारी द्वितीय श्रेणी, संतोष वासकर कनिष्ठ लिपिक, निलेश मुंढे कनिष्ठ लिपिक यांचा समावेश होता सदर पथका सोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सदर पथकाने देविदास घोडेचोर सहायक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांच्या मार्गदर्शनाखाली दि 1 जुलै रोजी अन्सार यूसुफ पठाण यांच्या राहत्या घरावर पंचा समक्ष व पोलीस कर्मचाऱ्यांसह छापा टाकून घरात झडती घेतली सदर झडती मध्ये कोरे चेक कोरे बॉंड इसार पावती आसे अनेक संशयास्पद कागदपत्रे अढळुन आली आसुन सदर कागदपत्रे पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आली. सदर कागदपत्रे पुढील कारवाई करीता सहायक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले आहेत.
घर झडतीमध्ये आढळुन आलेल्या कागदपत्रांची पडताळणी व शहानिशा करून अवैद्य सावकारा विरोधात (महाराष्ट्र सरकारी नियमन अधिनियम 2014 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई करीता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नगर दिग्विजय आहेर तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
तालुक्यात अवैद्य सावकारकी च्या जाचास त्रस्त व पिडीत नागरीकांनी स्वतःहून पुढे येऊन सहकार विभागाकडे तक्रार नोंदवावी सदर तक्रार बाबत अर्जदाराची गोपनीयता बाळगावी सदर तक्रारीची दखल घेऊन अवैद्य सावकारकी विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम अन्वय कारवाई करण्यात येईल असे अवहान जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नगर यांनी केली आहे.