सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यानिमित्त साकतमध्ये भव्य दिव्य ७५ फुट स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठा

0
941

जामखेड न्युज——

सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यानिमित्त साकतमध्ये भव्य दिव्य ७५ फुट स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठा

 

सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यानिमित्त साकतमध्ये भव्य दिव्य ७५ फुट स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तरी शिवप्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या डोळ्यात हा क्षण साठवावा असे आवाहन साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, कडभनवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवजयंती सोहळ्यानिमित्त साकतमध्ये भव्य दिव्य असा ७५ फुट स्वराज्य ध्वज प्राणप्रतिष्ठा आमदार रोहित (दादा) पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे तसेच यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी, प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक महेश पाटील असणार आहेत.

शिवजयंती व स्वराज्य ध्वज प्राणप्रतिष्ठा निमित्ताने रविवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता स्वराज्य ध्वजाची महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी तुळजापूर मंदिर येथे पुजा करण्यात येणार आहे.

रविवारी सायंकाळी ७ ते १० स्वराज्य ध्वजाची भव्य दिव्य अशी मिरवणूक साकतमध्ये काढण्यात येणार आहे.

सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी ७ ते ९ या काळात ७१ फुट स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठा आमदार रोहित पवार व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

सायंकाळी ७ ते १० या काळात पुणे येथील सुप्रसिद्ध ढोलपथक सह छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, कडभनवाडी ग्रामस्थांच्या व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट
आमदार रोहित पवार यांनी देशातील सर्वात उंच अशा स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठा खर्डा शिवपट्टन किल्ला समोर केली आहे. याच धर्तीवर साकतमध्येही आयोजक स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here