Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या दि. १७ ते १९ फेब्रुवारी तीन दिवस जामखेड मार्केटचे भुसार लिलाव बंद...

दि. १७ ते १९ फेब्रुवारी तीन दिवस जामखेड मार्केटचे भुसार लिलाव बंद राहणार – सभापती शरद कार्ले

0
660

जामखेड न्युज——

दि. १७ ते १९ फेब्रुवारी तीन दिवस जामखेड मार्केटचे भुसार लिलाव बंद राहणार – सभापती शरद कार्ले

 

भुसार मालाच्या खुल्या लिलाव प्रक्रियेसाठी दि. १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ असे तीन दिवस भुसार लिलाव बंद राहतील तरी सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.

भुसार मालाच्या खुल्या लिलाव नियोजन प्रक्रियेसाठी १७ ते १९ फेब्रुवारी रोजी जामखेडचे बाजार समितीचे लिलाव बंद राहणार असून सदर कालावधीत भुसार मालाचे लिलाव होणार नाहीत. अशी माहिती जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी दिली आहे.


याबाबत दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात सभापती कार्ले यांनी म्हटले आहे की, जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी हितासाठी नेहमीच अग्रेसर असते.


त्या अनुषंगाने सभापती झाल्यापासून शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार दि. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान बाजार समितीच्या वतीने आगामी काळात भुसार मालाचे ओपन लिलाव करण्यासाठी भुसार ओपन लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे.


यासाठी दि. १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ असे तीन दिवस भुसार लिलाव बंद राहणार आहेत. लिलाव बंद असल्याने जामखेड बाजार समितीत शेतमाल (भुसार) घेऊन येणारे शेतकरी व खरेदीसाठी येणारे व्यापारी यांची गैरसोय होऊ नये.


यासाठी प्रसिद्ध पत्रकाव्दारे हे आवाहन करण्यात येत असल्याचे सभापती पै. शरद कार्ले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!