जामखेड न्युज——
हनुमंत पाटील यांचा डॉ. सुनील वराट मित्रमंडळाच्या वतीने सत्कार
हनुमंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जामखेड तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज वराट हाँस्पिटल येथे सुनील वराट मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. सुनील वराट, सुनील हराळे, भास्कर भोरे, बाळासाहेब सानप, राजाभाऊ वराट, प्रकाश गवळी, बिभीषण वराट, बंकट वराट, माऊली गुळवे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हनुमंत पाटील हे साकतचे माजी सरपंच आहेत सध्याही साकत ग्रामपंचायत त्यांच्याच ताब्यात आहे. सुरूवातीपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत.
यावेळी सत्काराला उत्तर देताना हनुमंत पाटील म्हणाले की, पक्षश्रेष्ठी व आमदार रोहित पवार यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार. तसेच पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असे सांगितले.