जामखेडमध्ये प्रा. सचिन गायवळ अजित पवार गटाचा नवीन चेहरा ?

0
1695

जामखेड न्युज——

जामखेडमध्ये प्रा. सचिन गायवळ अजित पवार गटाचा नवीन चेहरा ?  

सामाजिक कार्यकर्ते तसेच युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे प्रा. सचिन गायवळ यांनी उघडपणे अजित पवार यांचे अभिनंदनाचे बॅनर शहरात लावले आहे यावरून एक स्पष्ट होत आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा जामखेड तालुक्यातील चेहरा म्हणून प्रा. सचिन गायवळ असु शकणार आहे. गायवळ यांचे गावागावात असणारे अनेक नेते कार्यकर्तेही अजित पवार गटात येण्याची शक्यता आहे तसे झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार हे गायवळ यांना बळ देऊ शकतात यांची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला आहे याबाबत आ रोहित पवार यांचा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते व कै गोपीनाथ मुंडे यांना मानणारे मंत्री धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते सचिन गायवळ यांची थेट जामखेड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावुन एकच खळबळ उडवून दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार गटाचा जामखेड तालुक्यातील चेहरा कोण असेल यांची उत्सुकता होती मात्र सचिन गायवळ यांनी बॅनर लावुन उघडपणे अजित पवार गटाला शुभेच्छा दिल्याने आ रोहित पवार यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

2018 साली लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रा. सचिन गायवळ यांनी मा. धनंजयजी मुंडे यांच्या उपस्थितीत खर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळेस पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम मनापासून व प्रामाणिकपणे करीत होतो, नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रोहित दादा पवार यांचे विधानसभेच्या निवडणुकीला निवडून आणण्यासाठी काम केले त्यानंतर झालेल्या जामखेड पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पंचायत समितीवर फडकवण्यासाठी आम्ही सौ. राजश्रीताई मोरे यांची सभापती पदी निवड करण्यासाठी प्रयत्न केले, त्यानंतर झालेल्या स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीत जामखेड तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.

परंतु आमदार रोहित दादा पवार यांचे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कानात गायवळ कुटुंबीया विषयी हेतू परस्परे काही घटना सांगून कान भरले त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी गायवळ यांनी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामावर चांगला दृष्टिकोन न ठेवता त्यांना पक्ष संघटनात्मक बाबींपासून दूर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला परंतु तरीही गायवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत होते.


परंतु जामखेड तालुक्यातील काही राष्ट्रवादीच्या कसलेही स्थान नसलेल्या पुढाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांचे कान भरले व मला पक्ष संघटनेपासून बाजूला ठेवण्यासाठी जाणून प्रयत्न केले.

त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मला विश्वासात न घेता घेतल्यामुळे मी माझे राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांच्या पॅनलला पाठिंबा दिला त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ताब्यातून गेली. आजही गायवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ या चिन्हापासून दूर झालेले नाहीत येथून पुढच्या काळात आदरणीय माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी गायवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम इथून पुढच्या काळातही प्रामाणिकपणे करणार आहेत असे प्रा. सचिन गायवळ यांनी सांगितले.

त्यानंतरही आ रोहित पवार यांचा यांचा बोध न घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुर ठेवले जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह मोठा आहे. आमदार रोहित पवार यांच्या जवळ कानफुगव्याची गर्दी झाल्याने आ रोहित पवार यांनी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसुन येत आहे. कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे दिसून येत होते देत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फुट पडल्याने अजित पवार यांनी महायुतीला पाठींबा देत सत्तेत सहभागी झाले होते त्यानंतर निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने कौल देत पक्ष व चिन्ह दोन्हीही अजित पवार गटाला मिळाले मात्र इतके घडत असताना जामखेड तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात शांतता होती आ रोहित पवार यांच्यामुळे उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमत होत नसल्याने अजित पवार गट तालुक्यात स्थापन होतो की नाही यांची साशंक लागुन होती मात्र निवडणूक आयोगाच्या निकालाने पक्ष व चिन्ह दोन्हीही अजित पवार गटाला मिळाले यांच संधीचं सोनं करत राष्ट्रवादी काँग्रेसचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक प्रा सचिन गायवळ यांनी थेट जामखेड शहरात विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावुन एकच खळबळ उडवून अजित पवार गटाचा चेहरा उघड केल्याने ही आमदार रोहित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा असणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here