नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व असणारे दिपक महाराज गायकवाड यांना बहुमताने विजयी करा – कॅप्टन लक्ष्मण भोरे पारनेर सैनिक बँकेच्या परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ

0
705

जामखेड न्युज——-

नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व असणारे दिपक महाराज गायकवाड यांना बहुमताने विजयी करा – कॅप्टन लक्ष्मण भोरे

पारनेर सैनिक बँकेच्या परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ

 

पारनेर सैनिक बँक पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या विचारांवर सुरू आहे. या बँकेचे नावलौकिक वाढावे यासाठी सैनिकांबद्दल आत्मियता असणारे सैनिकांचा अभिमान बाळगणारे दिपक महाराज गायकवाड आहेत त्यांच्या कडे नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व आहे. त्यामुळे आपण सर्व मतदार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून आणू असा विश्वास कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी व्यक्त केला.


पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक लि. पारनेर संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२४ मा. पद्मभूषण जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने परीवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार दिपक जिजाबा गायकवाड सर्वसाधारण प्रतिनिधी यांच्या प्रचाराचा नारळ ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात सैनिकांच्या हस्ते वाढवण्यात आला व प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सोमनाथ पोकळे, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण (मामा) धनवडे, प्रा. सुनिल नरके, कॅप्टन लक्ष्मण भोरे, कँप्टन विठ्ठल लेकुरवाळे, अर्जुन म्हत्रे, गणेश राळेभात, दादा डोके, कांतीलाल कवादे, शहाजी ढेपे, सतिश ढवळे, नानासाहेब कार्ले, राजकुमार भराटे, रावसाहेब कापसे, कचरू घोडके, संतोष जगदाळे, सुग्रीव आडाळे, दत्तात्रय डिसले, पोपट सांगळे, जगन्नाथ धर्माधिकारी, महादेव कार्ले, अशोक चव्हाण, बप्पा भोरे, कुंडलीक आडाळे, प्रमोद कार्ले, रमेश मोरे, तुकाराम ढोले, लक्ष्मण डोके, दादा डोके, दत्ता चऱ्हाटे, किसन चिलगर, कुंडल राळेभात यांच्या सह आजी माजी सैनिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना कॅप्टन भोरे म्हणाले की, सैनिकांबद्दल तळमळ असणाऱ्या उमेदवाराबद्दल आपणही मतदानाच्या रूपाने तळमळ दाखवू आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आणू.

यावेळी बोलताना उमेदवार दिपक महाराज गायकवाड म्हणाले की, आण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या बँकेचा विकास व्हावा म्हणून निवडणूक लढवत आहे. तसेच आगामी काळात तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांना सभासद करणारच असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी महादेव नेमाने, किसन चिलगर साहेब, डॉ. सुनील नरके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना
दिपक गायकवाड यांच्या पाठिशी उभे राहावे त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी. विमान चिन्हावर शिक्का मारावा आजी माजी सैनिकांचा विचार करणारे उमेदवार आहेत. त्याना सामाजिक व राजकीय सहकार्य आहे. दिपक गायकवाड हे सर्व समावेशक उमेदवार आहेत असे सांगितले. व शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here