जामखेड न्युज——
साकत घाटात बाँयलर गट्टूचा ट्रक पलटी, एक जखमी
अरूंद घाट, मोठे चढ यामुळे साकत घाटात नेहमीच अपघात होत आहेत. घाटाचे चढ कमी करून घाट रूंद करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आठ दिवसात एकना एक अपघात होत आहे. एम एच १६ सी. सी. ०७११ हा बाँयलर भरलेला ट्रक लातूर अंबाजोगाई येथून पुणे येथे चालला होता साकत घाटात वळण बसले नाही यामुळे पहिल्या वळणावर ट्रक पलटी झाला आहे. यात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.
सध्या जामखेड पंचदेवालय ते सौताडा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता खोदलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक साकत मार्गे सुरू आहे. पण अरुंद घामामुळे अवजड वाहनांना मोठी अडचण निर्माण होते. घाटात वळण लहान असल्याने गाड्यांना वळण बसत नाही.
जागतिक बँकेकडून करमाळा ते पाटोदा साकत मार्गे रस्ता सर्व्हे झाला आहे. लवकरात लवकर हा रस्ता सुरू व्हावा म्हणजे रूंद रस्ता व घाटाचे वळणे कमी करून चढ उतार कमी होतील. त्यामुळे लवकर रस्ता सुरू व्हावा अशी मागणी होत आहे.
लातूर अंबाजोगाई येथून बाँयलर भरलेला ट्रक पुण्याला चालला होता पहाटे पाचच्या आसपास साकत मार्गे चालला होता. साकत घाटात अरुंद रस्ता यामुळे वळण बसत नाही. पहिल्याच वळणावर चालकाला वळणाचा अंदाज आला नाही यामुळे बाँयलर भरलेला ट्रक पलटी झाला गाडीतील बाँयलर गट्टू सांडले. गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले तसेच चालक किरकोळ जखमी झाला आहे.
साकत घाटात नेहमीच लहान मोठे अपघात होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर घाटाचे वळणे कमी करून रस्ता रूंद करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. म्हणजे अपघात कमी होतील. अशी मागणी होत आहे.