जामखेड न्युज——
शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – उपसभापती कैलास वराट
शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे सुगीच्या कालापर्यंत शेतीमाल एकाचवेळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला जातो. त्यामुळे या कालावधीत शेतमालास बाजारभाव कमी होतात. शेतीमालास योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते ते होऊ नये म्हणून जागतिक बँक अर्थसहाय्यीत मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ( स्मार्ट) प्रकल्प कृषी विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ शासनाचा सार्वजनिक उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी केले आहे.
कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने
वखार आपल्या दारी महामंडळाचे वचन शेतकऱ्याचे संरक्षण अभियान या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा खर्डा येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी उपसभापती कैलास वराट बोलत होते यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाचे अधिकारी प्रशांत चासकर, खर्डा सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील, संचालक विठ्ठल चव्हाण, सा.का.अधिकारी संदिप ढवळे, कांतीलाल खिंवसरा सह शेतकरी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक बँक अर्थसहाय्यीत मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ( स्मार्ट) प्रकल्प कृषी विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ शासनाचा सार्वजनिक उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेतकरी वर्गाने घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
काढणी हंगामात शेतमालास जादा बाजारभाव मिळू शकतो, तसेच शेतकऱ्यास सुगीच्या कालावधीत असलेली आर्थिक निकड विचारात घेऊन त्यांना या गरजेच्या वेळी अधिक सहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र कृषि पणन मंडळ शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
शेतमाल तारण योजनेचा परिसरातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.