जामखेडच्या महिलेवरील अत्याचाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – अँड. डॉ. अरूण जाधव

0
1229

जामखेड न्युज——

जामखेडच्या महिलेवरील अत्याचाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – अँड. डॉ. अरूण जाधव

 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील आश्रम शाळेतील मुलांना आणण्यासाठी गेलेल्या जामखेड तालुक्यातील एका आदिवासी महिलेवर भुम येथील पोलीसानेच एका होमगार्ड कर्मचाऱ्याच्या मदतीने भुम तालुक्यातील परांडा रोडवरील एका ज्वारीच्या शेतात नेत आदिवासी महिलेवर पाशवी अत्याचार केला. पोलिसानेच होमगार्डच्या मदतीने बलात्कार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अँड डॉ. अरूण जाधव यांनी केली आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी दगडु सुदाम भुरके, पोलीस ठाणे, भुम व सागर चंद्रकांत माने. रा. भुम जिल्हा उस्मानाबाद या दोघांविरुद्ध भुम पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा या गावात रहिवासी असलेले आदिवासी समुदायाचे कुटुंब हे जामखेड तालुक्यातील नायगाव येथे ऊसतोडी काम करत आहे. पिडीत महिला व तीचा दीर या दोघांची मुले ही बार्शी तालुक्यातील येवली येथील आश्रम शाळेत शिकत आहेत. मात्र त्यांना समजले की त्यांची मुले आश्रमशाळेतुन पळुन गेली आहेत.

त्यामुळे पीडित महिला व तिचा दीर हे दोघेजण ३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २:३० वाजता खर्डा येथून भूम कडे निघाले त्यावेळी दुपारी ३:००च्या सुमारास भूम बस स्टॅन्ड येथे ते पोचले व बसची वाट पाहत होते. यानंतर त्या ठिकाणी एक इसम आला व तुम्ही येथे का थांबला आहेत, तुम्ही चोर दिसता, तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जातो मी पोलीस आहे असे म्हणुन त्याने मोबाईलवर दुसर्‍या व्यक्तीला फोन लावला बस स्टँड मध्ये गाडी घेऊन ये असे सांगितले. यानंतर पांढर्‍या रंगाची चारचाकी गाडी त्या ठिकाणी आली तसेच पिडीत महीलेला दहा हजार रुपयांची मागणी केली. नाहीतर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू असा दम दिला. त्या पीडित महिलेने वारंवार विनंती करून देखील ते ऐकत नव्हते त्यावेळी त्या पिढीत महिलेने जामखेड तालुक्यातील नायगाव येथील ऊसतोड कामगारांचे मुकादम नंदू उगले यांना फोन लावून पैसै पाठवण्यास सांगितले .त्यांनी होमगार्ड सागर माने यांच्या फोन पे ला १०,००० हजार रुपये पाठवले.

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही त्यानंतर भूम पोलीस स्टेशनचे आरोपी पोलीस दगडू भुरके हा म्हणाला की मि तुम्हाला बार्शी येथे जाणार्‍या गाडीत बसवून देतो आसे म्हणून तीच्या सोबत असलेल्या दिराला व पिडीत महिलेला परांडा रोडकडे घेऊन गेले. आरोपी पोलीस हा तिच्या दिराला म्हणाला की तु हिथेच थांब पोलीस स्टेशन मधून मला फोन आला आहे. तु मॅडमला भेटायला चल आसे म्हणून तू माझ्यासोबत शारीरिक संबंध कर तुला मॅडम कडुन सोडवतो तसेच तुझ्या दिराला केस मध्ये अडवणार नाही. त्यावेळी त्यापीडित महिलेने खुप विनंती केली मी तसे काही करणार नाही तरीसुद्धा त्या पोलिस कर्मचार्‍याने हाताला धरून तिला बळजबरी करून ज्वारीच्या शेतात घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पिडीत महीलेने घडलेला प्रकार ऊसतोड मुकादम व तीच्या वडीलांना सांगितला. पिडीत महीलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी दगडु सुदाम भुरके पोलीस ठाणे ,भुम व सागर चंद्रकांत माने. रा. भुम जिल्हा उस्मानाबाद या दोघांविरुद्ध भुम पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर आदिवासी समाजाचे नेते विशाल पवार यांना नातेवाईक कडून माहिती घेऊन त्यानंतर त्या पीडित महिलेला घरी बोलून घेतले व सविस्तर माहीती विचारपुस केली त्या नंतर दिनांक:- ३ फेब्रुवारी रोजी २०२४ रोजी पीडित आदिवासी महिलेला घेऊन वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष-भीमराव सुरवसे, आलेश शिंदे हे पीडित महिलेला घेऊन आले व भूम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरवंसे यांना सविस्तर माहीती दिली व पीडित महिलेच्या बाजूने गुन्हा दाखल करण्याचे काम केले. पिडीत महीलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी दगडु सुदाम भुरके पोलीस ठाणे ,भुम व सागर चंद्रकांत माने. रा. भुम जिल्हा उस्मानाबाद या दोघांविरुद्ध भुम पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबाला कायदेशीर मदत करण्यासाठी व या कुटुंबाला धीर देण्यासाठी ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव भटके विमुक्त राज्य समन्वयक,आदिवासी नेते विशाल पवार,बबन पवार भटके विमुक्त नेते मराठवाडा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष अतिश पारवे,द्वारका ताई पवार,माय लेकरु प्रकल्पाचे राजु शिंदे,रेश्मा ताई औटी, जाकिर तांबोळी, बापू एग्लिश्या पवार,वडार समाजाचे नेते व वंचित बहुजन आघाडीचे ता.उपाध्यक्ष भिमराव सूरवसे,आदि कार्यकर्ते उपस्थीत होते.अशी माहिती द्वारका ताई पवार व रेश्मा औटी यांनी दिली.

पुरोगामी महाराष्ट्राला, काळीमा फासणारी घटना – ॲड अरुण जाधव

 

पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य आहे (सदरक्षणाय खलनिग्रणाय)
या वाक्याला व पोलीस खात्याला, लोकशाहीला, ग्रहविभागला, पुरोगामी महाराष्ट्राला, काळीमा फासणारी बाब आहे. या घटनेचा बोध घेऊन महाराष्ट्र शासनाने पुढील काळात शासनाने महिलांसोबत कसे वर्तन करायचे व माणुसकी नावाची गोष्ट काय असते याचे शिक्षण ग्रह खात्याने दिले पाहिजे ही काळाची गरज आहे. भूम जि.उस्मानाबाद येथील पोलिसाने केलेल्या कृत्याचा सखोल निपक्षपातीपणे चौकशी करून अत्याचार ग्रस्तांना न्याय द्यावा व झालेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून या राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा न दिल्यास राज्यभर आम्ही सर्व आदिवासी भटके विमुक्त रस्त्यावर उतरून व्यापक स्वरूपाचे आंदोलन करणार असा इशारा ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांनी दिला आहे.

 

 

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here