जामखेड न्युज——
अमेय संजय हजारे यांची सी. ए. परीक्षेत उतुंग भरारी
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा
देवदैठण येथील मूळ रहिवासी असलेले जामखेड येथे पोलीस सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेऊन उद्योजकतेमध्ये यशस्वी झालेले उद्योगपती संजय रंगनाथ हजारे यांचे चिरंजीव अमेय संजय हजारे यांनी नुकत्याच झालेल्या सी.ए. चार्टर्ड अकाउंटंट अर्थात (सनदी लेखापाल) या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून होऊन उत्तुंग भरारी घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या चार्टड अकाउंट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून दि.९ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या या निकालामध्ये अमेय संजय हजारे याने २१९ गुण घेऊन सी.ए. चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सनदी लेखापाल ही पदवी प्राप्त केली आहे. अमेय संजय हजारे यांचे प्राथमिक शिक्षण खेमानंद इंग्लिश स्कूल जामखेड माध्यमिक शिक्षण येथे झाले आहे.
आज रोजी जामखेड शहरातील मोरे वस्ती येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी परिवारातल्या महिलांनी औक्षण करून पेढा भरविला या यशाबद्दल हजारे परिवार भारावून गेले. शहरातील शिक्षक, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अमेय संजय हजारे यांचे सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी कृषी भूषण रविंद्र कडलग, प्राध्यापक आबासाहेब वीर, प्राध्यापक दिलीप परदेशी, उद्योगपती प्रवीण चोरडिया,अशोक बाफना, पिंटू बोरा काशिनाथ अंदुरे, आनंद बाफना दिग्विजय देशपांडे आदींनी अभिनंदन केले. याप्रसंगी प्रकाश हजारे ,संजय हजारे, नितीन हजारे ,निलेश हजारे ,सचिन हजारे, प्रतीक हजारे ,अभिषेक हजारे ,संदीप घाडगे, हर्षद वीर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अमेय संजय हजारे यांची सी. ए. परीक्षेत उतुंग भरारी घेतल्याने देवदैठण, जामखेड, आष्टी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.