जामखेड न्युज——
गणित प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल – उद्धवराव देशमुख
ल. ना. विद्यालयात गणित प्रयोगशाळेचे उद्घाटन
विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत गणिताच्या संज्ञा, प्रमेय, सूत्रे आणि समीकरण अधिक स्पष्ट करून सांगणारी उपकरणे पाहता येईल. त्रिकोणातील तिन्ही कोनांची बेरीज 180 कशी येते, हे त्यांना पडताळून पाहता येईल. या प्रयोगशाळेत जुन्या काळातली परिमाणं, पायली, शेर, सव्वाशेर, मण तसेच सध्या वापरात असलेली लीटर, ग्रॅम, किलो अशी परिमाणं विद्यार्थ्यांना पाहता येतील. इथे असलेल्या विविध भौमितीक आकृत्यांमुळे विद्यार्थ्यांना गणित विषय मनोरंजक पद्धतीने शिकता येऊ शकणार आहे. माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या या प्रयोगशाळेत सुसज्ज डिजिटल बोर्डसुद्धा असून टच स्क्रीनद्वारे विद्यार्थी त्यावर कोणतंही गणित सोडवू शकणार आहेत असे मत उद्धव देशमुख यांनी व्यक्त केले.
आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी माननीय श्री उद्धवरावजी देशमुख अध्यक्ष दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड,उपाध्यक्ष श्री अरुणशेठजी चिंतामणी,सचिव शशिकांत देशमुख,सहसचिव दिलीप गुगळे,खजिनदार राजेश मोरे, संचालक अशोकशेठ शिंगवी शिक्षण तज्ञ अ ल देशमुख, महाविद्यालय प्राचार्य एम एल डोंगरे, सुभाष शेटे व संपूर्ण ब्रह्मे परिवार प्राचार्य श्रीकांत होशिंग, पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड, गणित विभाग प्रमुख भरत लहाने, प्राध्यापक आजिनाथ शिरसाट व पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
गणित प्रयोगशाळेचे संपूर्ण ब्रह्मे परिवाराच्या हस्ते व सर्व संचालक यांच्या उपस्थित गणित प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी प्रास्ताविक केले कै.डॉ.किशोर चिंतामण ब्रह्मे यांच्या स्मरणार्थ श्रीमती शैलाताई यांच्या वतीने गणित प्रयोगशाळेला मोठा निधी निधी देण्यात आला व त्यातून सुसज्ज अशी गणित प्रयोगशाळा ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी उभी करण्यात आली.
या गणित प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होईल.त्याचबरोबर अशा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे ब्रह्मे परिवाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल आणि त्याचबरोबर जामखेड तालुक्यातील पहिली गणित प्रयोगशाळा तयार झाली आहे,असे मनोगतात सांगितले.त्यानंतर उद्धवराव देशमुख यांनी ब्रह्मे परिवाराचे आभार मानून करून अशा उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गणितज्ञानामध्ये निश्चित भर पडेल व भावी आदर्श नागरिक तयार होतील यात शंका नाही.आजचा हा सुवर्णयोग आहे शाळेच्या विकास होईल.गणित प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनामधील गणिताची भीती कमी होऊन प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकता येईल आणि ते ज्ञान कायमस्वरूपी लक्षात राहील. विद्यार्थी कधीही विसरणार नाहीत असे मनोगत पूर्ण केले.
शिक्षण तज्ञ अ ल देशमुख यांनी गणित हा अतिशय महत्त्वाचा घटक असून नुसता फळा व पुस्तकाद्वारे शिकवण्यापेक्षा तो या गणित प्रयोग शाळेमुळे प्रात्यक्षिकाद्वारे शिकवला जाईल व ते ज्ञान विद्यार्थी कधीही विसरणार नाहीत विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल आमच्या शाळेमध्ये सुंदर अशी गणित प्रयोगशाळा होती. त्यामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रिया चांगली होईल विद्यार्थ्यांना याचा भविष्यात निश्चित उपयोग होईल यांनी आपले मनोगतातून सांगितले.असे आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणित अध्यापक भरत लहाने, अजिनाथ शिरसाट,कैलास वराट, विजय क्षिरसागर,श्रीमती स्वप्नाली घाडगे,पंकज पोकळे त्याचबरोबर शिक्षक प्रतिनिधी किशोर कुलकर्णी, समारंभ प्रमुख पोपट जगदाळे,एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे,कलाशिक्षक राऊत मुकुंद,विशाल पोले,आदित्य देशमुख,हनुमंत वराट,साई भोसले,निलेश भोसले सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल देडे यांनी केले व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री प्रवीण गायकवाड यांनी केले.