जामखेड न्युज—–
साकत येथील प्रियंका वराट वाणिज्य शाखेतून महाराष्ट्रात सर्वप्रथम
पाटोदा – येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. प्रियंका नारायण वराट हिने बी. कॉम. तृतीय वर्ष परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रियंका वराट हिने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर खडतर परिस्थितीला सामोरे जात हे यश संपादन केले आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा साकत, माध्यमिक शिक्षण श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे झाले आहे तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पाटोदा – येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे घेतले.
प्रियंका वराट हि लहानपणापासून शांत व जिद्दी मुलगी होती. हे तिने यश मिळवून दाखवून दिले आहे.
दि. २० डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या दिक्षांत समारंभात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांच्या उपस्थितीत कु. प्रियंका वराट हिला सुवर्णपदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
कु. प्रियंकाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांच्या हस्ते तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. गणेश पाचकोरे, पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक डॉ. संजय बोंडगे, केंद्रसहाय्यक प्रा. संतोष खाकरे आदि उपस्थित होते.
तिच्या यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा साकत सर्व स्टाफ, श्री साकेश्वर विद्यालय मुख्याध्यापक व सर्व स्टाफ, तसेच जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, प्रा. अरूण वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, प्रा. श्रीराम मुरूमकर, प्रा. अशोक डोंगरे, प्रा. भागवत वराट, प्रा. महादेव वराट, प्रा. माणिक वराट, ज्ञानदेव मुरूमकर यांच्या सह अनेक मान्यवरांनी प्रियंकाचे अभिनंदन केले आहे.