सावित्रीबाई फुलेंमुळेच मुलींना शिक्षणाची द्वारे खुली – उपसभापती कैलास वराट

0
277

जामखेड न्युज——

सावित्रीबाई फुलेंमुळेच मुलींना शिक्षणाची द्वारे खुली – उपसभापती कैलास वराट

 


भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं. त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली. सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली असे मत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी व्यक्त केले.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी केली यावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती शरद कार्ले सह संचालक मंडळ व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपसभापती कैलास वराट म्हणाले की, सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.


भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here