जामखेड न्युज——
मोहा ग्रामपंचायतच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी होणार लाल मातीचे मैदान
असं म्हणतात, “Sound mind in sound body” निरोगी शरीरात, निरोगी मन वास करते. मुलांच्या आयुष्यात खेळाला अन्यन्य साधारण महत्व आहे. खेळाने मुलांचा शारिरीक आणि मानसिक विकास तर होतोच, परंतु त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक विकास घडवण्याचे महत्त्वाचे काम खेळ करतात. यामुळे खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आजकाल मात्र खेळ या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले पहावयास मिळते. पूर्वीचे काही खेळ तर आज दिसेना झाले आहेत. मुलांच्या हातात मोबाईल
आले मोबाईल गेम आल्या यामुळे मैदानावर मुले जात नाहीत. यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो. मुले मैदानावर गेल्यावर खेळतात बागडतात यामुळे शारीरिक व मानसिक विकास घडतो यामुळे ग्रामपंचायतने लाल मातीचे मैदान शाळेत करण्याचे ठरवले व कामाला सुरुवात केली.
तालुक्यातील मोहा येथील युवा नेते माजी सरपंच शिवाजी डोंगरे, विद्यमान सरपंच भीमराव कापसे, उपसरपंच वामन डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य विकास सांगळे, वसंत झेंडे, पंडित गायकवाड यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेतील मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज खेळाचे मैदान तयार करून लाल माती टाकण्याचे निश्चित करून लगेच कामाला सुरुवात केली.
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा या गावचे सरपंच भीमरावजी कापसे तसेच माजी सरपंच शिवाजी काका डोंगरे उपसरपंच वामन डोंगरे ग्रामपंचायत सदस्य विकास सांगळे वसंत झेंडे पंडित गायकवाड यांनी शाळेला अचानक भेट दिली असता त्याच्या संकल्पनेतून शाळेसमोरील परिसर हा मुलांना खेळण्यासाठी जेसीपी ने दोन फूट खाली उकरून त्यावर मुरूम टाकूनमुलांना खेळण्यासाठी लाल मातीचे ग्राउंड तयार करून देण्याचे ठरवले
लगेच कामाला सुरुवात करून शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकलायाबद्दल शाळा सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे शाळेच्या वतीने आभार.
शाळेला ग्रामपंचायतीचे सतत सहकार्य असते कोणतेही काम सांगितले की लगेच आम्हाला वेळेत करून देतात त्याबद्दल पुन्हा एकदा शाळेच्या वतीने ग्रामपंचायत चे आभार मानले.