Tuesday, April 28, 2026
Home शैक्षणिक बातम्या आमदार रोहित पवार यांच्या हस्ते मयूर भोसले यांना ‘सेकंड ऑफिसर’ रँक प्रदान

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते मयूर भोसले यांना ‘सेकंड ऑफिसर’ रँक प्रदान

0
5

जामखेड न्युज—–

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते मयूर भोसले यांना ‘सेकंड ऑफिसर’ रँक प्रदान

रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय, जामखेड येथील राष्ट्रीय छात्र सेना(आर्मी)चे ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांना एनसीसीमध्ये ‘सेकंड ऑफिसर’ पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा आमदार रोहित दादा पवार यांच्या शुभहस्ते त्यांना स्टार लावून रँक प्रदान करण्यात आली.

मयूर भोसले यांनी नागपूर येथील ‘कामठी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी’ (OTA) मध्ये आपले खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यानंतर त्यांची ‘थर्ड ऑफिसर’ वरून ‘सेकंड ऑफिसर’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या गौरव सोहळ्यानिमित्त जामखेड परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य राजेंद्र कोठारी व नितीन गोलेकर, कन्या विद्यालय स्कूल कमिटीचे सुरेश भोसले, तहसीलदार धंनजय बांगर, गटविकास अधिकारी शुभम जाधव , प्राचार्य मडके बी. के., पर्यवेक्षक जाधवर एस. व्ही, संतोष पवार, सुहास जाधव यांसह विविध विभागाचे अधिकारी, शिक्षक आणि एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सतरा महाराष्ट्र बटालियनचे सी ओ कर्नल प्रसाद मिराज , नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत यांनी विशेष अभिनंदन केले.

सामाजिक कार्याची दखल: आ. रोहित पवार
यावेळी शुभेच्छा देताना आमदार रोहित पवार म्हणाले, “एनसीसी ऑफिसर मयूर भोसले हे केवळ एक शिक्षक नसून ते सामाजिक उपक्रम व स्वछता उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त रुजवण्याचे मोलाचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस आणि लवकरात लवकर पुढील प्रमोशन मिळावे यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा.”

विक्रमी कामगिरीचा आलेख-
मयूर भोसले यांनी एनसीसीच्या माध्यमातून अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड:-देशातील सर्वात मोठा प्रजासत्ताक दिन साजरा करून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली.

आशिया बुक ऑफ रेकॉर्ड: – मानवी रचनेतून जगातील सर्वात मोठा भारताचा नकाशा साकारून जामखेडचे नाव जागतिक स्तरावर चमकवले.

कलात्मक सहभाग:- महापुरुषांच्या जयंती निमित्त नागेश विद्यालयातील राजमाता जिजाऊंचे भव्य चित्र आणि खर्डा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य चित्राच्या निर्मितीत त्यांचा मोलाचा सहभाग होता.

कोविड मधील कोव्हिड-१९ च्या काळात त्यांनी रयत कोविड माहिती व मदत केंद्राचे समन्वयक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. अनावश्यक खर्च टाळून मुलीच्या वाढदिवसानिमित्त 24 ऑक्सिजन सिलेंडर आरोळे कोविड हॉस्पिटलला मदत केली.

एक शिस्तप्रिय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रात करिअर करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहित करणारे मार्गदर्शक म्हणून मयूर भोसले यांची ओळख आहे.व जामखेड तालुका कलाशिक्षक संघटनेच्या अध्यक्ष पदाची धुरा त्यांचाकडे आहे.
त्यांच्या या यशाबद्दल जामखेड करांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!