Friday, May 8, 2026
Home शैक्षणिक बातम्या ल. ना. होशिंग विद्यालयाची ७५ वर्षांची गुणवत्तेची परंपरा कायम दहावीचा ९४.६१...

ल. ना. होशिंग विद्यालयाची ७५ वर्षांची गुणवत्तेची परंपरा कायम दहावीचा ९४.६१ टक्के निकाल, २३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण

0
2

जामखेड न्युज – – – – – 

ल. ना. होशिंग विद्यालयाची ७५ वर्षांची गुणवत्तेची परंपरा कायम

दहावीचा ९४.६१ टक्के निकाल, २३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण

 

गेल्या ७५ वर्षापासून शैक्षणिक गुणवत्ता कायम राखत याही वर्षी दहावीच्या निकालात विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे. ल. ना. होशिंग विद्यालयाचा ९४.६१ टक्के निकाल नोंदवला गेला असून, विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी विशेष ठरली आहे.

दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथील दहावी (एस.एस.सी) बोर्ड परीक्षा सन २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या निकालामुळे विद्यालयाने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयाने एकूण ९४.६१ टक्के निकाल नोंदवत तालुक्यात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे अ+ श्रेणी प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे हे विद्यालय तालुक्यात व जिल्ह्यात एकमेव ठरले आहे.

विद्यालयातून कु. श्रावणी किरण जाधव हिने ९४.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. अनन्याश्री बजरंग देशमुख हिने ९४.०० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. गायत्री राहुल जाधव हिने ९३.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच कु. ऋतिका अंबादास भागवत हिने ९३.२० टक्के गुणांसह चौथा, तर चि. आदर्श संतोष पवार याने ९२.६० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.

विद्यालयातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २३ असून, विशेष प्राविण्य श्रेणीत १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत ८८ विद्यार्थी, तर द्वितीय श्रेणीत ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

निकालात लक्षणीय वाढ झाली असून, विद्यालयाने तालुक्यासह जिल्ह्यात गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.ल.ना.होशिंग विद्यालयाचा दहावी निकाल हा केवळ यश नसून गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा परिणाम आहे. भविष्यातही अशा कामगिरीची अपेक्षा पालक वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

विद्यालयाची ७५ वर्षांची गुणवत्तेची वैभवशाली परंपरा असून बारावी निकालाची उज्वल परंपरा, तसेच एन.एम.एम.एस. व विविध स्पर्धा परीक्षांमधील उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे सचिव अरूणशेठ चिंतामणी, अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख, संचालक शिवाजी कासार, दत्तात्रय वडे, दिपक होशिंग आदी संचालक मंडळ तसेच माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे यांच्यासह प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य प्रा. युवराज भोसले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे सह शिक्षक,पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!