जामखेड न्युज——
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात
आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबाच्या दर्शनाला जाताना त्याच्या गाडीचा अपघात झाला आहे. यात स्वीय साहाय्यक किरकोळ जखमी झाले असून मंत्री तानाजी सावंत सुखरूप आहेत.
कोल्हापूर पन्हाळा मार्गावर रजपूतवाडी येथे दोन गाड्या एकमेकांना धडकून ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीच जीवित हानी झाली नसून आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे सुखरूप आहेत.
तर त्यांचे स्वीय सहाय्यक रविराज जाधव किरकोळ जखमी झाले आहेत. मंत्र्यांच्या गाडीला त्यांच्या ताफ्यातीलच गाडीने धडकले आहे. या अपघातात गाड्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्याला कोल्हापुरात अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र, मंत्री सावंत यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झालेले आहेत. तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते.
दोन गाड्या एकमेकाला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये मंत्री तानाजी सावंत यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही. पण त्यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झालेले आहेत.