विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जामखेड कालिका पोदार स्कुलचे कार्य उल्लेखनीय – प्रकाश पोळ

0
409

जामखेड न्युज——-

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जामखेड कालिका पोदार स्कुलचे कार्य उल्लेखनीय – प्रकाश पोळ

शैक्षणिक क्षेत्राबरोबरच जामखेड कालिका पोदार स्कुलचे विद्यार्थी सर्वागीण विकासासाठी काम खुपच उल्लेखनीय आहे. या शाळेने खेळाबरोबरच आपली संस्कृती जपली आहे. कालिका पोद्दार स्कूलच्या या रोपट्याचा भविष्यात वटवृक्ष निर्माण होईल, येथे विद्यार्थ्यांची सर्वागीण तयारी करून घेतली जात आहे. स्पर्धा परिक्षाबाबत मार्गदर्शन व तयारी करून घेतली जात आहे यामुळे भविष्यात अनेक विद्यार्थी उच्च अधिकारी होतील असे मत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी व्यक्त केले.


कालिका पोदार लर्न स्कूल (CBSE) जामखेड मध्ये दुसरा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी प्रकाश पोळ तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, बबन काका काशिद, कृषी अधिकारी अशोक शेळके, कैलास खैरे, यांच्या सह महादेव डुचे, रविंद्र कडलग,याबरोबर कालिका पोदार लर्न स्कूल (CBSE) चे संस्थापक उमाकांत अंदुरे, नितिन तवटे, प्रशांत कानडे, निलेश तवटे, सागर अंदुरे, प्राचार्य जोशी सह पालक शिक्षक संघाचे सदस्य,पत्रकार,पालक वर्ग उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस कालिका पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खंडागळे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली चित्त थरारक रोप वे व मल्लखांब प्रात्यक्षिके करून सर्वाची मने जिंकली. यानंतर स्केटिंग व लाठीकाठी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. नंतर एलकेजी, युकेजी, पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपली बहारदार गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली माननीय प्राचार्य श्री प्रशांत जोशी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य यांनी केले त्यात त्यांनी यावर्षी घेतलेल्या विविध कार्यक्रमाचे व विद्यार्थी उपयोगी प्रयोजनांचे वाचन केले व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था नेहमी बांधिल असेल असे त्यांनी प्रमाणित केले. 

यावेळी बोलताना प्रकाश पोळ म्हणाले की, या शाळेत खरोखरच विविधांगी उपक्रमातून विद्यार्थ्यांना संस्कार सोबतच शारिरीक व बौद्धिक विकास या गुणांना वाव दिला जात आहे व या कार्यक्रमासाठी त्यांनी शाळेचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here