जामखेड महाविद्यालयांमध्ये वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे संपन्न

0
294

जामखेड न्युज——

जामखेड महाविद्यालयांमध्ये वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे संपन्न

तंत्रज्ञानाचा वापर करत असताना सामाजिक व मानसिक आरोग्य जपले पाहिजे असे आवाहन जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डोंगरे. एम .एल यांनी केले. दिशा फाउंडेशन व जामखेड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे हा कार्यक्रम राबवण्यात आला.


दिशा फाउंडेशन च्या अध्यक्ष मा.रेखा चौधरी व मा .वैशाली चव्हाण यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला.आज आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण, स्मार्टफोन टेलिव्हिजन, कॉम्प्युटर, टॅबलेट सोशल मीडिया इत्यादींचा अनिर्बंध असा वापर सुरू झालेला आहे.


या सर्व उपकरणांच्या आपण अधीन होत चाललो आहोत. बहुतांशी बरेचशे जण, जगण्याच्या या लढाईमध्ये, ताण तणाव, निद्रानाश, निराशा, दुरावलेले सामाजिक संबंध इत्यादी दुष्परिणामांना आपण सामोरे जात आहोत.


माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आपण काही नैसर्गिक कौशल्य उदाहरणार्थ पत्रलेखन, वाचन ,लेखन, पाठांतर यापासून दूर चाललो आहोत. सुदृढ अशा मानसिक आरोग्यासाठी दिवसभरातला काही काळ का होईना पण या उपकरणापासून दूर राहिले पाहिजे.

त्यासाठी World Digital Detox Day ही एक अत्यंत निकराची आणि काळाची गरज आहे. आजच्या या डिजिटल युगात स्क्रीन चा वापार जास्त वाढला असून त्या मुळे मानसिक आजाराला आमंत्रणच मिळत आहे आणि हे कुठे तरी रोखायला हवं. डिजिटल जग, technology चा उपयोग योग्य व्हावा या साठी झेप फाऊंडेशन आणि जामखेड महाविद्यालय जामखेड यांच्यावतीने वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे साजरा करण्यात आला.


आज ६५ देशामध्ये डीजिटल डीटॉक्स चे मोलाची कामगिरी करतोय. त्यांचे मनापासुन आभार. आम्ही पण या चळवळी मध्ये सहभाग घेउन या कार्याला हातभार लावत आहोत. 10 December या World Digital Detox Day रोजी सुमारे 986 पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले.या उपक्रमात कला विभागाचे प्रमुख प्रा.फलके सर, प्रा.देशपांडे मॅडम , प्रा मोहोळकर सर, प्रा भाकरे सर, प्रा दराडे सर, प्रा देशमुख सर, प्रा. कांबळे सर प्रा.दळवी सर , प्रा.डोंगरे मॅडम, प्रा.कुलकर्णी मॅडम, प्रा. डिसले मॅडम, व इतर अनेक मान्यवर प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here