जामखेड न्युज——
कमालच!! विद्यार्थ्यांनी भाजीपाला विक्रीतून केली लाखोंची उलाढाल!!!
खर्डा प्राथमिक शाळेत बालआनंद मेळावा संपन्न
शाळेत खेळण्या बागडण्याच्या वयात पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहार काय असतो, आपला माल विक्री कसा करायचा अन् हिशोबाने पैसे कसे कमवायचे याचा अनुभव देण्यासाठी जामखेड तालुक्यातील खर्डा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाजार भरला होता. या बाजारात पालक हे गिऱ्हाई झाले अन् मुले भाजीपाला विक्रेते. विद्यार्थ्यांनी भरविलेल्या या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. यानिमित्ताने चिमुकल्यांनी व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घेतला.
शाळेत दफ्तर मुक्त मुक्त अभियान अंतर्गत बाल आनंद मेळावा भरला होता. शाळेतील पहिली ते सातवीच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी सुमारे 96,260 रूपयांची उलाढाल झाली. भाजी बाजारसाठी अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा मुले, खर्डा मुली व उर्दू शाळेने शालेय विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा व खाद्यपदार्थ व भाजीपाल्याचा बाजार भरवला .या कार्यक्रमांमध्ये सुमारे 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व 96260 रुपयांची विक्री झाली.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून खर्डा गावचे सरपंच सौ संजीवनीताई वैजनाथ पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे हे होते. या कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच श्रीकांत लोखंडे, महालिंग कोरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज मिसाळ, शशिकांत गुरसाळी यांचे सह शिक्षण विस्तार अधिकारी केशव गायकवाड, केंद्रप्रमुख सुरेश मोहिते, केंद्रप्रमुख नवनाथ बडे, केंद्रप्रमुख विक्रम बडे, अब्दुलमुईद शेख, खलील आतार (उर्दू व्यवस्थापन समिती अध्यक्ष), चेअरमन चंद्रकांत गोलेकर, डॉ खोत, संतोष पगारीया, दिगंबर थोरात यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळभाज्या, खाद्यपदार्थ, स्वतः बनवलेल्या वस्तू त्याचबरोबर आपल्या घरून तयार केलेल्या वस्तू बाजारात आणल्या होत्या, यामध्ये इडली सांबर, पाणीपुरी, आप्पे, मिसळ, ढोकळा, वडापाव, कचोरी, बटाटे, कांदे, वांगे, फ्लावर, कोबी, बोरे, पेरू, चिकू, ऊस, पपई आदींसह वेगवेगळ्या पालेभाज्या बाजारात आणल्या होत्या.
यातून विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया, व्यवहारज्ञान, सुट्टे पैसे देणे, घेणे या सर्व मूलभूत क्रियांबरोबरच स्व विक्रीचा आनंद मिळाला. या कार्यक्रमांमध्ये खर्डा शाळेचे मुख्याध्यापक राम निकम, मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव गीते, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख यांचे सह जानकीराम खामगळ, दिनकर मोहोळकर, संतोष वहील, चंद्रकांत अरण्ये सर ,श्रीहरी साबळे, श्रीमती ज्योती ढवळशंख, श्रीमती ज्योती रासकर, श्रीमती समीना सय्यद, श्रीमती कृतांजली वराडे, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती सुवर्णा मानेकर, श्री निसार सय्यद सर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर मुलांना गोड लापशीचे मिष्टान्न भोजन देण्यात आले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोंडेश्वरी तरुण मंडळामार्फत करण्यात आली होती.