जामखेड न्युज——
विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी आमदार रोहित पवार यांच्या सायकलींचा मोलाचा वाटा – संजय वराट
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळालेल्या सायकलचा मोलाचा वाटा राहिल तसेच सायकलमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे याच वेळेचा उपयोग अभ्यासासाठी उपयोगात येईल असे जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर सेवाभावी संस्था साकतच्या जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गरजू 42 विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी डोंगरे, मोहा गावचे सरपंच भीमराव कापसे, सावरगावचे सरपंच काका चव्हाण, संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे सचिव कैलास वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, व्हाईस चेअरमन दादासाहेब नेमाने, महादेव फाळके, विनय डुकरे, निखिल जगताप, माजी सरपंच कांतीलाल वराट, महादेव वराट, नानासाहेब लहाने, युवराज वराट, बाळू वराट, गणेश सानप, दशरथ नेमाने, जनार्दन कोल्हे, बाळू गवळी, बाबासाहेब यादव, अशोक कोल्हे, अंगद कोल्हे, नाना कोल्हे, विष्णू कोल्हे, राजेंद्र कोल्हे, गोतम कोल्हे सह कोल्हेवाडी परिसरातील अनेक ग्रामस्थ व जय हनुमान विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायकल हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. कर्जत-जामखेड मतदारसंघातील ५वी ते १०वीत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची शाळेत येण्या-जाण्याची सोय व्हावी व त्यांचा वेळ वाचावा. या उद्देशाने मतदारसंघात पहिल्या टप्प्यात तब्बल १० हजार सायकली वाटण्यात आल्या आता परत काही सायकली वाटप करण्यात येत आहेत. यातून विद्यार्यांप्रति आमदार रोहित पवार यांची आत्मियता दिसून येते. असे संजय वराट यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील विविध विषय घेऊन ते सातत्याने मंत्रालयात किंवा संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांच्या कार्यालयातही भेटी-गाठी घेताना दिसून येतात. तसेच, मतदारसंघातही त्यांचा वावर असतो.
मतदारसंघातील शाळकरी मुलांसाठी रोहित पवार यांनी स्तुत्य उपक्रम राबवलाय. तो म्हणजे शाळेतील मुलांना घर ते शाळा जाण्यासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल १० हजार सायकलींचे वाटप केलंय. आणखीही वाटप सुरू आहे. असे बोलताना इतर मान्यवरांनी सांगितले.
चौकट
विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांसाठी युवा संघर्ष यात्रा
विद्यार्थी व युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा आहे. आमदार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांसाठी कायम आग्रही असतात. आपल्या मतदारसंघात अधिकाधिक निधी नेण्यासाठी प्रयत्नशील असतात.
कैलास वराट (उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड)