जामखेड नगरपरिषदेतील शेतकऱ्यांची ग्रामपंचायत मध्ये सामील करण्याची मागणी

0
856

जामखेड न्युज——

जामखेड नगरपरिषदेतील शेतकऱ्यांची ग्रामपंचायत मध्ये सामील करण्याची मागणी

 

जामखेड नगरपरिषद हद्दीतील हजारो शेतकरी हे कांदा चाळ, ठिबक सिंचन, शेततळे, सिंचन विहीर, फळबाग योजना या शासकीय योजनांपासून वंचित आहेत. जामखेड नगरपरिषद हद्दीतील जांबवाडी, चुंभळी, लेहनेवाडी, धोत्री, जमदरवाडी, बटेवाडी, भुतवडा या गावातील बहुतेक लोक शेतीच करतात पण नगरपरिषद हद्दीत असल्याने शासकीय योजना पासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे आम्हाला नगरपरिषदेत नको ग्रामपंचायत मध्ये सामील करावे अशी मागणी होत आहे.

नगरपरिषद स्थापन करताना लोकसंख्या कमी पडत असल्याने जशी ग्रामपंचायत रचना होती तशीच रचना ठेवत जामखेड नगरपरिषद हद्दीत जांबवाडी, चुंभळी, लेहनेवाडी, धोत्री, जमदरवाडी, बटेवाडी, भुतवडा या गावांचा समावेश केला होता. पण आता शासकीय योजना मिळत नसल्याने या गावातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. नगरपरिषद अंतर्गत वेगवेगळ्या योजना तर ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळ्या योजना असतात ग्रामीण भागासाठी वेगळ्या तर शहरी भागासाठी वेगळ्या योजना असतात. सातही वाड्या व गावे ग्रामीण भागात येत आहेत यामुळे ग्रामीण भागातील योजना मिळत नाहीत.

जांबवाडी, चुंभळी, लेहनेवाडी, धोत्री, जमदरवाडी, बटेवाडी, भुतवडा या गावातील शेतकऱ्यांनी आम्हाला नगरपरिषदेत नको परत ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शेतकऱ्यांसाठी असलेल्या कांदा चाळ, ठिबक सिंचन, शेततळे, सिंचन विहीर, फळबाग योजना या शासकीय योजनांपासून जामखेड नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे यामुळे नगरपरिषद पेक्षा ग्रामपंचायत चांगली असा सुर सध्या या सात गावातील नागरिकांचा निघत आहे. यामुळे आम्हाला आता ग्रामपंचायत मध्ये सामील करावे आम्हाला नगरपरिषदेत नको.


चौकट
पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या फक्त ग्रामपंचायत साठीच लागू करता येतात. तसेच रोजगार हमी योजनेचे नावच ग्रामीण रोजगार हमी योजना आहे. त्यामुळे त्या योजना फक्त ग्रामपंचायत हद्दीत राबविण्यात येतात.

प्रकाश पोळ (गटविकास अधिकारी जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here