जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील पोलीस पाटील पदांचे आरक्षण जाहीर
सहा महिन्यात दुसऱ्यांदा आरक्षण काढण्याची प्रशासनावर वेळ
सहा महिन्यांपुर्वी कर्जत जामखेड तालुक्यातील ११४ गावातील रिक्त पोलीस पाटील पदांचे आरक्षण कर्जत प्रातांधिकारी यांनी एप्रिल महिन्यात काढले होते. पण याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. यानुसार जिल्हाधिकारी यांनी सर्व आरक्षण प्रक्रिया रद्द केली होती. आणि पुन्हा काल कर्जत जामखेड तालुक्यातील ११४ गावातील रिक्त पोलीस पाटील पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात जामखेड तालुक्यातील ४८ गावांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सहा महिन्यात दुसऱ्यांदा आरक्षण काढण्याची प्रशासनावर वेळ आली आहे आता तरी भरती होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्जत तालुक्यातील ६६ तर जामखेड तालुक्यातील ४८ गावातील रिक्त पोलीस पाटील पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
एप्रिल महिन्यात काढण्यात आलेल्या आरक्षणात काही गावात त्या प्रवर्गातील लोकसंख्या नसताना आरक्षण निघाले अशी तक्रार होती.
लोकसंख्येनुसार आरक्षण नव्हते तेव्हा जिल्हाधिकारी यांनी सर्व आरक्षण प्रक्रिया रद्द केली होती आणि पुन्हा नव्याने काल ११४ गावातील पोलीस पाटील रिक्त पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
जामखेड तालुक्यातील 48 गावांचे पोलीस पाटील पदासाठी आरक्षण पुढील प्रमाणे
कोल्हेवाडी – ईडब्ल्युएस,
पिंपळवाडी- खुला प्रवर्ग
सरदवाडी – विशेष मागास प्रवर्ग,
नागोबावाडी- भटक्या जमाती,
मुंगेवाडी- ईडब्ल्युएस,
पांढरेवाडी- खुला प्रवर्ग,
दरडवाडी – खुला प्रवर्ग,
माळेवाडी – इतर मागास प्रवर्ग,
वंजारवाडी (तरडगाव) – खुला,
दौंडवाडी – इतर मागास प्रवर्ग,
काटेवाडी – खुला महिला,
डोळेवाडी – भटक्या जमाती महिला,
जायभायवाडी – ईडब्ल्युएस,
आनंदवाडी – भटक्या जमाती,
पारेवाडी – इतर मागास प्रवर्ग,
भवरवाडी – विमुक्त जाती,
वंजारवाडी (धानोरा) – ईडब्ल्युएस,
डिसलेवाडी – खुला,
राजेवाडी -ईडब्ल्युएस,
गुरेवाडी – अनु जमाती,
महारूळी – इतर मागास प्रवर्ग,
चोभेवाडी – खुला महिला,
पोतेवाडी – विशेष मागास प्रवर्ग महिला,
मतेवाडी – ईडब्ल्युएस,
मुंजेवाडी – ईडब्ल्युएस,
धामणगाव -खुला महिला,
लोणी – इतर मागास प्रवर्ग,
बोर्ले – खुला प्रवर्ग,
चौंडी – अनु-जमाती,
पिंपरखेड – भटक्या जमाती (ब),
खामगाव – इतर मागास प्रवर्ग महिला,
वाकी – विशेष मागास प्रवर्ग,
घोडेगाव – अनु -जाती,
बांधखडक – अनु -जमाती,
सांगवी – अनु -जमाती,
मोहरी – अनु जाती महिला,
बावी – इतर मागास प्रवर्ग,
सोनेगाव – इतर मागास प्रवर्ग,
धानोरा – इतर मागास प्रवर्ग,
गिरवली – खुला,
तरडगाव -अनु- जाती,
आघी – अनु- जाती महिला,
पाडळी – ईडब्ल्युएस,
नाहुली – खुला, हसनाबाद – अनु – जमाती,
पिंपळगाव आळवा – विशेष मागास प्रवर्ग,
वाघा – खुला, बाळगव्हाण – खुला
चौकट
एप्रिल २०२३ मध्ये पोलीस पाटील रिक्त पदांचे कर्जत जामखेड तालुक्यातील ११४ गावचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. पण जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. यानुसार जिल्हाधिकारी यांनी सर्व आरक्षण प्रक्रिया रद्द केली होती आणि पुन्हा नव्याने लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पोलीस पाटील रिक्त पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यानुसार लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल. असे जामखेड न्युजशी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले