जामखेड न्युज——
एवन टेक्सटाईलच्या रूपाने जामखेडमध्ये पुण्या मुंबईच्या तोडीचे दुकान – आमदार प्रा. राम शिंदे
जामखेड शहरात पुण्या मुंबईच्या तोडीचे एवन टेक्सटाईल कापड दुकानाचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर झाला आहे. आणि अल्पावधीतच जामखेड सह परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. अल्प दरात उत्तम दर्जाचे कापड जामखेड मध्ये एवन टेक्सटाईलच्या रूपाने मिळत आहे. असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.
आज आमदार प्रा. राम शिंदे यांनी एवन टेक्सटाईल ला सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अमित चिंतामणी, कांतीलाल खिवंसरा, पांडुरंग माने, ज्ञानेश्वर झेंडे, मनोज कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकुमार गोरे, डॉ. गणेश जगताप, मोहन गडदे, मोहन देवकाते, अल्ताफ शेख, एवन टेक्सटाईलचे संचालक साधु (नाना बोराटे) , विनायक राऊत, महेश राऊत, भाग्यश्री राऊत, किरण बोराटे, दत्तात्रय बोराटे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी सांगितले की, जामखेड शहरात भव्य- दिव्य असे एवन टेक्सटाईल दुकान झाले आहे. यामुळे जामखेडच्या वैभवात भर पडली आहे. आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.
वै. विठ्ठल आण्णा राऊत यांचे कार्य सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी होते. त्यांचे आशिर्वाद मिळणार आहेत त्यांमुळे अल्पावधीतच एवन टेक्सटाईल उंच भरारी घेईल असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला.
एवन टेक्सटाईल हे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे जामखेड परिसरातील लोकांना काय हवे ते राऊत व बोराटे यांनी दुकानाच्या रूपाने दिले आहे. एवन टेक्सटाईल साठी शुभेच्छा दिल्या.