जामखेड न्युज——
ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवमतदार नोंदणी अभियान संपन्न
ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालययात जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर तसेच वर्शिप अर्थ फाऊंडेशन अहमदनगर सह मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, अहमदनगर ,यांच्या संयुक्त विद्यमाने आज कला वाणिज्य विज्ञान शाखेतील 18 वर्षे पूर्ण झालेल्या किंवा एक जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नव मतदार विद्यार्थ्यांचा मतदार नाव नोंदणी कॅम्प संपन्न झाला.
नवमतदार नोंदणी साठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला ,पासपोर्ट फोटो आई वडील यांचे मतदान कार्ड, सोबत घेऊन आले होते.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्रीकांत होशिंग, तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ प्रा. श्री कोल्हे बी. यु. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन उपप्राचार्य श्री जरे पी.पी. व नोडल अधिकारी प्रा.श्रीम.पोकळे पी.आर, वर्शिप अर्थ फाऊंडेशन जिल्हा समन्वयक सचिन कांबळे . तज्ञ प्रा. शेख एस.ए. व प्रा.भोगील बी.बी त्याचप्रमाणे प्रा.आघाव सर यांच्या उत्कृष्ट प्रस्ताविकाने सुरुवात झाली.
या कार्यक्रमासाठी कॉलेज कॅम्पस अँबेसिडर ,वर्ग प्रतिनिधी, नवमतदार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीम. पोकळे पी.आर. यांनी तर आभार प्रा.श्री. ढेरे सर यांनी व्यक्त केले.