ऐकावे ते नवलच, तब्बल चार फुट बाजरीचे कणीस

0
1129

जामखेड न्युज——

ऐकावे ते नवलच, तब्बल चार फुट बाजरीचे कणीस

 

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात बाजरी पीक घेतले जाते. बाजरी तसे पारंपरिक पीक सर्वांनीच अनुभवले, पण आजवर आपण साधारण फूटभर लांब कमीच पाहिले असेल मात्र सांगोला तालुक्यातील कोळा येथील राहुल वाले शेतकऱ्याने पेरलेल्या बाजरीला तब्बल चार फुटापर्यंत लांबीचे कणीस लागल्याने ही आश्चर्यकारक बाब परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

शेतकरी वर्ग पारंपारिक पिकाकडे पाठ फिरवून नगदी पिकाकडे वळाला असताना , आता पारंपारिक पिकातही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत सांगोला तालुक्यातील कोळा येथील शेतकरी राहुल वाले यांनी लावलेल्या बाजरीला तीन ते चार फुटापर्यंत कणीस लागल्याने ते पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. बाजरीचे चांगले उत्पादन होणार आहे.

 

राजस्थान वरून पोस्टाने एक हजार रुपये किलो दराने बाजरीचे गावठी बियाणे आणून त्याची आपल्या शेतात पेरणी केली होती यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने पीक चांगले जोमात आले बहरलेल्या बाजरीला तब्बल तीन ते चार फुटापर्यंत कणीस लागल्याचे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

वाले यांनी 20 गुंठ्यात ही बाजरी घेतली असून त्यातून उत्पन्न चांगले निघेल असा अंदाज आहे नियमित करण्यात येणाऱ्या बाजरी पिकापेक्षा तिपटीने जास्त उत्पादन बाजरी पीक देते असा दावाही वाले यांनी केला.बाजरी बियाण्याची जात तुर्की असून कणसाची लांबी 4 ते 5 फूट आहे. वीस गुंठ्यात अर्धा किलो बियाणे लागले विशेष म्हणजे यासाठी मोजकीच खते त्यासाठी वापरले आहेत. 

तुर्की व आपल्या बाजरीतील फरक

 

आपल्या भागातील बाजरी व तुर्की जात असलेल्या बाजरी मध्ये फरक असल्याचा वाले यांनी सांगितले. तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये उष्णता कमी प्रमाणात असल्यामुळे ही बाजरी मुळव्याध व शुगर असलेल्या नागरिक खाऊ शकतात.

मी राजस्थान वरून एका शेतकऱ्याकडून पोस्टाने बाजरीचे बियाणे मागवले होते मी वीस गुंठ्यात अर्धा किलो बियाने पेरले असून व या बाजरीला किरकोळ खते वगळता फक्त पाणीच दिले आहे सध्या माझ्या शेतात तीन ते चार फुटाचे कणीस लागले असून हा प्रयोग मी प्रथमच केला आहे.

राहुल वाल, शेतकरी, कोळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here