पोखरी जवळील अपघातात दोन ठार दोन जखमी जखमी भावंडावर जामखेड व नगर येथे उपचार सुरू

0
1997

जामखेड न्युज——

पोखरी जवळील अपघातात दोन ठार दोन जखमी

जखमी भावंडावर जामखेड व नगर येथे उपचार सुरू

शिर्डी येथून तुळजापुरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात झाडावर आदळली. या भीषण अपघातात चालकासह एक महिला जागीच ठार झाली. तर दोन भावंडे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान आष्टी तालुक्यातील पोखरी येथे घडली.

शिर्डी येथील महिला आपल्या दोन मुलांसह तुळजापुर येथे देवदर्शनासाठी आज सकाळी कारने ( क्रमांक एम.एच ०३,बी सी.६७३६ ) बीड नगर राष्ट्रीय महामार्गाने जात होत्या. दरम्यान, आष्टी मार्गे जात असताना सकाळी अकराच्या सुमारास चालकाचा स्टेअरिंग वरील ताबा सुटल्यानंतर कार रोड लगतच्या झाडावर आदळली.

कारचा वेग जास्त असल्याने या भीषण अपघातात चालक रूपेश बबन भेडे, अनिता राहुल इंगोले ( ३३ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अभय राहुल इंगोले ( १२), अनोप राहुल इंगोले ( १४, सर्व रा.शिर्डी ) हे दोघे भावंडे गंभीर जखमी झाले आहेत. नगर व जामखेड येथील रूग्णालयात या दोन भावंडावर उपचार सुरू आहेत.


माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस हवालदार काळे, वाणी, कन्हेरे यांनी भेट देत पंचनामा केला. 

 

चालक व महिलेचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here