जामखेड न्युज——
अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
आरोपीस अटक
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याचे समोर आले आहे. ही घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी घडली असून आज १८ नोव्हेंबर रोजी सदर आरोपी रियाज बालीश शेख रा. पिसोरे खांडगाव ता. श्रीगोंदा याचे विरुध्द जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड पोलीसांनी आरोपीस अटक केली आहे.
ं
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील हाळगाव येथे राहणारी १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनी ही दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:०० सुमारास हळगाव शिवारातील कृषी विद्यालयाजवळील जंगलात आरोपी रियाज बालीश शेख हा यातील फिर्यादी अल्पवयीन पिडीत मुलीस त्यांचेकडील मोटारसायकल वरुन घेवून जात असताना गांव शिवारातील कृषी विद्यालया जवळील जंगलात घेवुन जावून गाडीवरुन खाली उतरवून तिचे हाताला धरून जवळ ओढुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
आपण दोघे लग्न करु त्यावर यातील फिर्यादी हिने आरोपीस तिला तिचे घरी हाळगाव येथे सोडण्याची विनंती केली. तरी देखील आरोपी रियाज शेख याने फिर्यादीस दोन मिनीट थांब असे म्हणून परत फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
यावरून सदर १७ वर्षीय अल्पवयीन पिढीतेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रियाज बालीश शेख रा. पिसोरे खांडगाव ता. श्रीगोंदा याचे विरुध्द जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी या करत आहेत.